मुंबई - न्यूयॉर्क टाईम्सच्या स्पष्टीकरणामुळे मोदी सरकारची पोलखोल झाली आहे. आम्ही सातत्याने लोकांवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. आज तो खरा ठरला आहे आहे. देशातील सध्याची स्थिती आणीबाणीपेक्षा ( worst situation than Emergency ) ही भयंकर आहे, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. ते माध्यमांशी बोलत होते.
मोदी सरकारने २०१७ मध्ये पेगॅसस सॉफ्टवेअर खरेदी केले. याकरिता 15 हजार कोटींचा इस्राईलसोबत करार केला, असे न्यूयॉर्क टाईम्सने वृत्त प्रकाशित केले ( New York Times report on Pegasus ) आहे. यावरून शिवेसेनेचे खासदार तथा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका ( Sanjay Raut slammed Modi gov ) केली आहे. त्यांनी म्हटले, की या विरोधात सातत्याने आम्ही संसदेमध्ये आणि बाहेर आवाज उठविला. आजही आमची तीच मागणी आहे.
हेही वाचा-Weather In India : देशभरात आताच थांबणार नाही थंडीचा कहर, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी होईल बर्फवृष्टी
पेगॅसेसची पोलखोल
देशात प्रमुख पत्रकारांचे, राजकारण्यांचे इतकेच कशाला दोन केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पाळतीवर ठेवले होते. मोदी सरकार आणि पेगॅसेसची पोलखोल करण्यासाठी संसदेला पुरावे देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांच्यासह सगळ्यांनी सत्य आणि तथ्य दाखवून दिले. परंतु, मोदी सरकारने आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे संसदेचे कामकाज बंद पाडले. मात्र, आता न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या खुलासामुळे मोदी सरकार तोंडघशी पडले आहे, असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा-Sitaram Kunte On Anil Deshmukh : अनिल देशमुख बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, सीताराम कुंटेंची ED ला धक्कादायक माहिती
आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती
येत्या अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. सरकार आमची तोंड बंद करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही प्रश्न विचारणार असल्याने सरकारच्यावतीने संसद चालू दिली जाणार नाही. आमच्यासारख्या हजारो लोकांचे फोन ( Sanjay Raut on phone tapping ) पाळतीखाली आहेत. संभाषण ऐकले जात आहे. सर्वांच्या बँक खात्यांसंदर्भात लहान व्यवहारांची माहिती घेण्यात येत आहे. लोकशाही राहिलेली नाही. उलट आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती देशात निर्माण झाल्याचा आरोप राऊत यांनी केला.
हेही वाचा-TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक
विरोधकांना मनावर घेऊ नका
महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्याबाबत शिवसेना नेते राऊत म्हणाले, की मोदी सरकारची पॉलिसी काय आहे? महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतल्यावर विरोधक छाती बडवून घेत आहेत. साध्वी यांनीही थोडी थोडी पिया करो, असे सांगितले आहे. त्यांनी केले तर सत्यवचन आणि आम्ही केले तर सत्यवचन नाही का, भाजपने यावर स्पष्टीकरण द्यावे, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र सरकारने बहुमताने निर्णय घेतला आहे. विरोधक काय बोलतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना बोलत राहू दे. सरकारने फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ आणि सरकारच्या महसूलात वाढ व्हावी, हा उद्देश असल्याचे राऊत म्हणाले.
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत काय म्हटले आहे?
अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2017 मधील इस्रायल भेटीचाही संबंध असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ( PM Narendra Modi in Israel ) होते. तर या भेटीनंतर इस्रायल पंतप्रधान बिन्यामिन नेत्यान्याहूदेखील जून 2019 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. यानंतर भारताने संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पॅलेस्टाईन मानवाधिकार संघटनेच्या मान्यतेवर इस्रायलच्या बाजूने मतदान केले होते.