ETV Bharat / city

'योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादसह चेन्नईमधील फिल्मसिटीतही जाऊन त्यांना बोलवावे'

आम्ही नवीन फिल्म सिटी उभारणार आहेत. तरीही शिवसेना चिंतेत का? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला आज केला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Dec 2, 2020, 4:11 PM IST

मुंबई - योगी आदित्यनाथ यांनी केवळ मुंबईच नाही तर हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटी आणि चेन्नई येथील फिल्मसिटीतही जाऊन त्यांनाही बोलवावे. बघूया ते करतील का, असा 'टोमणावजा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये नवीन फिल्म सिटी उभारणार असल्याची आज घोषणा केली आहे.

आम्ही नवीन फिल्म सिटी उभारणार आहेत. तरीही शिवसेना चिंतेत का? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला आज केला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की नोएडा येथे आधीही फिल्मसिटी उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? मुंबईमुळे देशाचे पोट भरते. मुंबईशी स्पर्धा करणे सोपे नाही.

हेही वाचा-योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांची मुंबईत भेट, फिल्म सिटीबद्दल चर्चा

भाजपने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटले आहे. आधी भाजपच्या लोकांनी ठरवावे, मुंबई ही मुंबई आहे? की पाकव्याप्त काश्मीर आहे? असेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी अद्याप मंजूर केली नाही. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, की राज्यपाल घटनेच्या पलीकडे जाऊन निर्णय घेणार नाहीत. त्यांना घटनेचा अभ्यास करावा लागेल. होईल पण जरा उशिरा होईल.

हेही वाचा-आम्ही नवीन फिल्म सिटी उभारणार, शिवसेना चिंतेत का? - योगी आदित्यनाथ

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, की आम्ही नवीन फिल्म सिटी तयार करत आहेत. बॉलिवूडची फिल्म सिटी ही मुंबईतच राहणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

अक्षय कुमारशीही योगी आदित्यनाथांची चर्चा

दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. ट्रायडेंट हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या दरम्यान त्यांनी अक्षय कुमारशी युपीतील गौतम बुद्ध नगरमधील यमुना एक्स्प्रेस-वे जवळ बांधल्या जाणाऱ्या फिल्म सिटीबद्दल चर्चा झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.