ETV Bharat / city

Sanjay Raut criticizes Narendra Modi : 'नेमकचि बोलणें' पंतप्रधानांना भेट देऊ; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

"भारतीय जनता पक्षाला देशात एक्य नको" शरद पवारांनी हे आपल्या भाषणातून पंचवीस वर्षांपूर्वी सांगितले होते. मात्र आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजले. भाजपा देशाला मागे घेऊन चालले ते आम्हाला आता समजले. अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर ( Sanjay Raut criticizes BJP ) केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले यावेळी शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut criticizes Narendra Modi ) बोलत होते.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Dec 11, 2021, 6:07 PM IST

Updated : Dec 11, 2021, 6:59 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे शीर्षक नेमकची बोलणे असल्याने हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देऊ. तसेच हे पुस्तक देताना शीर्षकाचे फुल करून आम्ही त्यांना सांगू असा टोला शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut criticizes Narendra Modi ) यांनी लगावला आहे. "भारतीय जनता पक्षाला देशात एक्य नको" शरद पवारांनी हे आपल्या भाषणातून पंचवीस वर्षांपूर्वी सांगितले होते. मात्र आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजले. भाजपा देशाला मागे घेऊन चालले ते आम्हाला आता समजले, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर केली.

शिवसेने नेते संजय राऊत भाषण करताना

राऊतांची पंतप्रधानांवर टीका -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 61 भाषणाचं 'नेमकीच बोलणें' या पुस्तकाचे प्रकाशन ( Sharad Pawar speech book Published in Mumbai ) करण्यात आले. यावेळी भाषणादरम्यान संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान यांच्यावरही टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे शीर्षक नेमकी चे बोलणे असल्याने हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देऊ. तसेच हे पुस्तक देताना शीर्षकाचे फुल करून आम्ही त्यांना सांगू असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. शरद पवार यांनी व्यक्त केलेले 25 वर्षापूर्वीचे त्यांच्या विचारांवर ते आजही ठाम आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील मराठी माणसाला आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन केले होते. दोन महिन्यापूर्वी वरळीच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाला आपली घरं न विकण्याचा आवाहन केले. म्हणजेच 25 वर्षा आधी जे शरद पवार म्हणत होते ते आजही म्हणत आहेत. देशांमध्ये संवाद होऊ द्यायचा नाही. केवळ झुंडशाही सुरू आहे असे संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच कवी किशोर कदम यांच्या कवितेचा दाखला देत महा विकास आघाडी मधील तिन्ही पक्षांनी एकमेकांना हात दिला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

खुर्ची का दिली? असे वाटत असेल तर पुस्तक वाचा -

दिल्लीच्या एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसायला दिलेल्या खुर्चीवरून भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मात्र शरद पवार यांना आपण खुर्चीत का दिली? हे ज्यांना कळलं नाही, त्यांनी आज प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं वाचन करावं असा सल्ला संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिला. तसेच राजकारणात विकृती वाढत चालली असल्यावर त्यांनी खंतही व्यक्त केली.

पवारांचे सावरकरांवरील भाषण महत्त्वाचे -

शरद पवार यांनी बारामती मध्ये वीर सावरकर यांच्यावर केलेले भाषण महत्त्वाचे आहे. या भाषणाची टिपणी व्हायला हवी. वीर सावरकरांच्या माता बद्दल काही मत भेद त्यांचे असू शकतील. मात्र वीर सावरकरांनी केलेलं काम शरद पवार यांनी आपल्या त्या भाषणातून सांगितले आहे. याची आठवण संजय राऊत यांनी आवर्जून करून दिली.

हेही वाचा - Sharad Pawar Speech Book : तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कसे ठेवता? कवी किशोर कदमांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

Last Updated : Dec 11, 2021, 6:59 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.