ETV Bharat / city

"भाजपाला मुंबईवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचाय" - sanjay raut accuses BJP

2022 च्या मुंबई मनपा निवडणुकांसाठी भाजपाने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनपावर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे वकव्य केले. त्याला सेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला.

sanjay raut news
"भाजपाला ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचाय"
author img

By

Published : Nov 19, 2020, 12:22 PM IST

Updated : Nov 19, 2020, 1:28 PM IST

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने 'मिशन मुंबई'ची घोषणा करत 2022 साठी कंबर कसली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपावर भाजपाचा भगवा फडकेल, असा दावा केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना, शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असे वक्तव्य सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. भाजपाला ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचा असून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजपाला ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचाय

मुंबईत काल भाजपाची कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवण्याचा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावर बोलताना, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेणं भाजपासाठी योग्य असल्याचे राऊत यांनी म्हटले. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही. आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध आहे, असं भाजपला वाटत असल्यास त्याचा निर्णय जनता घेईल, असे राऊत म्हणाले. आज जो भगवा फडकतोय, तो कधी उतरलाच नाही. तुम्ही आज भगवा उतरवण्याच्या कामाला लागला आहात. म्हणजेच तुम्हाला एकाप्रकारे ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा घाट

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा घाट सुरू आहे. भाजपची सत्ता आल्यास हे नक्कीच होईल, असा दावा राऊत यांनी केलाय. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईतील उद्योजकांना आपल्या राज्यात बोलावतात. याविरोधात भाजपचा एकही नेता बोलत नाही. भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना बीएमसीत रस असण्याचे मुख्य कारण मुंबईतील उद्योजक आहेत. भाजपाला आर्थिक उलाढालीत रस आहे. त्यांना मुंबईला दिल्लीची पायपुसणी करायची आहे आणि आम्ही ते होऊ देत नाही, याचं त्यांना दु:ख आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केलाय. त्यांना मुंबई विकायची आहे, मुंबई घशात घालायची आहे, असे ते म्हणाले. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय. मुंबईवर आलेल्या संकटाच्या वेळी मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा. आमच्यासाठी एकच भगवा आहे जो शिवरायांचा आहे, असे राऊत म्हणाले.

कंगना, अर्णबवर टीका

बीएमसीने ज्या नटीचं कार्यालय तोडलं, ती भाजपची कार्यकर्तीच आहे. ती मुंबई पोलिसांना माफिया म्हणते. मुंबईला पाकिस्तान बोलते. मुंबईकर तिच्याविरोधात उसळून उठले, पण तिच्या समर्थनार्थ ज्यांच्याकडे शुद्ध भगवा आहे ते रस्त्यावर उतरले. अन्वय नाईक या मराठी माणसाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अँकरवर गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे आहोत. पण हे लोक त्या अमराठी अँकरच्या पाठिशी उभे राहून रस्त्यावर येत आहेत. हे तुमचं मराठीपण, हा भगवा आहे का? असाया प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

जंगल वाचवण्याची शिवसेनेची भूमिका

इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजूरमार्ग अशी टीका फडणवीसांनी सरकारवर केली आहे. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची गोष्ट ही सरकार आल्यावर झालेली नाही. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून हीच भूमिका आहे. जंगल वाचवण्यासंदर्भात शिवसेनेने भूमिका सोडलेली नाही, असा पुनरोच्चार त्यांनी केला.

Last Updated : Nov 19, 2020, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.