ETV Bharat / city

प्रदेशाध्यक्षपदाच्या काटेरी मुकुटातील काटे मिलिंद देवरांना टोचतील - संजय निरुपम - CONGRESS

आज काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मिलिंद देवरा यांनी मोठ्या गाजावाजात स्वीकारला.

author img

By

Published : Mar 28, 2019, 10:32 PM IST

मुंबई - काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा काटेरी मुकुट मी नवीन प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांना देऊन जात आहे. त्यांना यातील बरेच काटे टोचतील, त्याच्या वेदनाही होतील. मात्र, त्यांना त्या काट्याऐवजी कायम फुले मिळावे, अशा शुभेच्छा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मिलिंद देवरा यांच्यावर सोपवताना संजय निरुपम यांनी दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या मनातली खदखद समारोपाच्या भाषणातून व्यक्त केली. आज काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मिलिंद देवरा यांनी मोठ्या गाजावाजात स्वीकारला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या पदभार कार्यक्रमात बोलताना संजय निरुपम

यावेळी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, प्रा.जनार्धन चांदूरकर, उर्मिला मातोंडकर, आदी दिगग्ज नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या काळातच निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केल्याने त्यांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली. आपल्यावर मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर देशात आणि राज्यात आपले सरकार नव्हते, अत्यंत कठीण काळात मी जबाबदारी घेतली आणि ती प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे त्या काळात जे माझ्यासोबत होते, त्यांचे आणि माझ्यासोबत न येता विरोधात राहिले त्यांचेही मी स्वागत करतो, असेही निरुपम म्हणाले.

एकनाथ गायकवाड यांचे नाव घेतलेच नाही -
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोडत असताना मंचावर निरूपम यांच्या विरोधातील अनेक नेते मंचावर होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सर्व नेत्यांची नावे आदराने घेतली. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी आपल्या भाषणात निरुपम यांच्या नावाचा साधा उल्लेख केला नाही. दरम्यान, मिलिंद देवरा यांनी मात्र पदभार स्वीकारताना निरुपम यांच्या योगदानाचे कौतुक करत ते कायम माझ्या सोबत असतील असा विश्वास व्यक्त केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी मुंबईत आता तरुण नेतृत्व मिळाले असल्याने २००९ प्रमाणे सर्व लोकसभेच्या जागा जिंकुन आणण्याचे आवाहन केले.

Intro:काटेरी मुकुट मी मिलिंद देवरा यांना देऊन जातोय- संजय निरुपम

मुंबई, ता. 28:

मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा काटेरी मुकुट मी नवीन प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांना देऊन जातो त्यांना यातील बरेच काटे लागतील ही त्याच्या वेदनाही होतील. परंतु त्यांना या काट्याऐवजी कायम फुके लागावे अशा शुभेच्छा देत मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार देवरा यांच्यावर सोपवताना संजय निरुपम यांनी आपल्या मनातली खदखद समारोपाच्या भाषणातून व्यक्त केली.
मुंबईत आज काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मिलींद देवरा यांनी मोठ्या गाजवाजात स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, प्रा.जनार्धन चांदूरकर, उर्मिला मातोंडकर, आदी दिगग्ज नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या काळातच निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केल्याने त्याविषयीची खदखद त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करत आपल्या विरोधातील नेत्याचे नाव न घेता त्यांचे आपल्याला काटे कसे रुतले हे सांगितले. आपल्यावर मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर देशात आपले सरकार आणि पंतप्रधान तर राज्यात आपले मुख्यमंत्री नव्हते, अत्यंत कठीण काळात मी जबाबदारी घेतली आणि ती प्रामाणिकपणे पार पाडली. त्यामुळे त्या काळात जे माझ्यासोबत होते, त्यांचे आणि माझ्यासोबत न येता विरोधात राहिले त्यांचेही मी स्वागत करतो असेही निरुपम म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोडत असताना मंचावर निरूपम यांच्या विरोधातील अनेक नेते मंचावर होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सर्व नेत्यांची नावे आदराने घेतली, मात्र माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी मात्र आपल्या भाषणात निरुपम यांच्या नावाचा साधा उल्लेख केला नाही..
दरम्यान, मिलिंद देवरा यांनी मात्र पदभार स्वीकारताना निरुपम यांच्या योगदानाचे कौतुक करत ते कायम माझ्या सोबत असतील असा विश्वास व्यक्त केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी मुंबईत आता तरुण नेतृत्व मिळाले असल्याने 2009 प्रमाणे सर्व लोकसभेच्या जागा जिंकुन आणण्याचे आवाहन केले.

Body:काटेरी मुकुट मी मिलिंद देवरा यांना देऊन जातोय- संजय निरुपम

Conclusion:काटेरी मुकुट मी मिलिंद देवरा यांना देऊन जातोय- संजय निरुपम
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.