मुंबई - मुंबईच्या समुद्रात मालवाहतूक बोट बुडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बोटीत तीन खालाशी होते. मात्र, सहकारी बोटीने या तिन्ही खलाशांचा जीव वाचवला आहे. मुंबई पोस्ट ट्रस्टकडून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.
अशी घडली घटना - मिळालेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेल्या जहाजावरील माल किनाऱ्यावर आणण्यासाठी (शिप टू शोअर) ही बोट तैनात करण्यात आली होती. मात्र, शनिवारी दुपारी या मालवाहू बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने या बोटीला जलसमाधी मिळाली. बोट बुडत असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला. जवळच्या एका मालवाहू बोटीवर असलेल्या अन्य खलाशांनी त्यांना दोरीच्या सहाय्याने आत घेतले. त्यानंतर काही सेकंदानी या बोटीला जलसमाधी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोर्ट ट्रस्टकडून करण्यात येत असून मालवाहू बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेला जात होता का, या दिशेने तपास करण्यात येणार असल्याचे समजते.
समुद्रा मालवाहू बोटीला जलसमाधी;कोणतीही जीवितहानी नाही - समुद्रा मालवाहू बोटीला जलसमाधी
मुंबईच्या समुद्रात मालवाहतूक बोट बुडली आहे. परदेशातून आलेल्या जहाजावरील माल किनाऱ्यावर आणण्यासाठी (शिप टू शोअर) ही बोट तैनात करण्यात आली होती. मात्र, शनिवारी दुपारी या मालवाहू बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने या बोटीला जलसमाधी मिळाली.