मुंबई - आज सकाळी राज्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित काही फोटो ट्विट केले होते. याला समीर वानखेडे यांनी परिपत्रक काढत उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे माझी आणि माझ्या परिवाराची प्रतिमा मलिन करत असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले समीर वानखेडे -
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी माझ्याशी संबंधित काही कागदपत्रे ट्विट केले आहेत. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे हिंदु असून ते निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. तसेच माझी आई जाहीदा ही मुस्लीम होती. मी एक धर्मनिरपेक्ष परिवारातील असून मला त्याचा गर्व आहे. माझा 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी माझा विवाह झाला होता. नंतर 2016 मध्ये आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती रेडकर यांच्याशी विवाह केला, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावरही आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांकडून बदनामीकारक ट्विट करण्यात येत आहेत. त्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला नाहक त्रास सहन करावा लागते आहेत. हा माझी आणि माझ्या परिवाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - नवाब मलिक म्हणाले 'फर्जिवाडा इथूनच सुरु होतो', समीर वानखेडेंची NDPS कोर्टात वादग्रस्त माहिती