ETV Bharat / city

'रेनिसान्स स्टेट' या पुस्तकावर बंदी घालावी, संभाजी ब्रिगेडची मागणी

वरिष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण रेनिसान्स स्टेट या पुस्तकातून केले असल्याचे संभाजी ब्रिगेड यांनी सांगितले आहे. त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रेनिसान्स स्टेट
रेनिसान्स स्टेट
author img

By

Published : May 24, 2021, 6:33 PM IST

मुंबई - वरिष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकामध्ये केले आहे. यावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा - भुताटकीसारखे शब्द वापरणे म्हणजे पोरखेळ - देवेंद्र फडणवीस

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. चारित्र्यसंपन्न, स्वराज्य निष्ठीत व स्वराज्यरक्षक असणाऱ्या राजावर रयतेचे सुद्धा प्रचंड प्रेम होत. अशा महान छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणे हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात अनाजीपंत यांनी ज्या पद्धतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही कथा, कांदबऱ्या, मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही. या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे. आम्हा सगळ्या इतिहास संशोधक - अभ्यासकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत असे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सांगण्यात आले आहे.

जोपर्यंत लेखक गिरीश कुबेर आणि प्रकाशक हार्पर कॉलिंस हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत. कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. ते अभ्यासू आहेत असेही बोलले जाते. ते छत्रपती संभाजी महाराजांविषयी अज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे ? याचीही चौकशी झाली पाहीजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करु तसेच सरकारने सदर पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही करीत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे यांनी सांगितले.

हेही वाचा - सारथी संस्थेकडे अडकलेली फेलोशिप जूनमध्ये मिळेल - विनायक मेटे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.