मुंबई - पनवेल फॉर्महाऊसच्या शेजाऱ्यासोबत चाललेला वाद अभिनेत्याला भारी पडण्याची चिन्ह दिसत आहेत. या प्रकरणात सुरु असलेल्या केसमुळे आता सलमानच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Salaman Khan Panvel farmhouse) केतन कक्कड या शेजाऱ्याने जमिनीसंदर्भात सलमानवर जे आरोप केले होते त्यामध्ये तथ्य असल्याचे मुंबईच्या सिव्हिल कोर्टाने हे मान्य केले आहे. त्याचा कुठलाही आरोप खोटा नाही. त्यामुळे कोर्टाने सलमानने शेजाऱ्याविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्याला रद्दबातल केले आहे.
-
A sessions court in Mumbai rejected actor Salman Khan's interim plea for 'gag order' in a defamation suit against his NRI neighbour Ketan Kakkar & social media platforms. He presented evidence of complaints regarding allegations of encroachments by actor in Panvel said the court
— ANI (@ANI) March 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A sessions court in Mumbai rejected actor Salman Khan's interim plea for 'gag order' in a defamation suit against his NRI neighbour Ketan Kakkar & social media platforms. He presented evidence of complaints regarding allegations of encroachments by actor in Panvel said the court
— ANI (@ANI) March 31, 2022A sessions court in Mumbai rejected actor Salman Khan's interim plea for 'gag order' in a defamation suit against his NRI neighbour Ketan Kakkar & social media platforms. He presented evidence of complaints regarding allegations of encroachments by actor in Panvel said the court
— ANI (@ANI) March 31, 2022
जमिनीच्या प्लॉटवर येण्यास मनाई केली - सलमानने दावा केला होता की, हे आरोप त्याची फक्त माझी बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. परंतु, कोर्टाने केतनने जे पुरावे सादर केले होते त्यांच्या आधारावर सलमानचे म्हणणे खोटे होते असे मान्य केले आहे. (Injunction Application) सलमानचा शेजारी तक्रारदार केतनने सलमानविरोधात जमिनीसंदर्भातले पुरावे सादर करताना म्हटले होते, की त्याला जमिनीच्या प्लॉटवर येण्यास मनाई केली आहे.
सलमान खान स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्यात अयशस्वी - मुंबई सेशन कोर्टाचे न्यायाधीश ए.एच. लद्दाद म्हणाले, की सलमान खान स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्यात अयशस्वी ठरला आहे. ती जमिन सलमाननचीच आहे हे त्याला पूर्ण सिद्ध करता आले नाही. कक्कडने मात्र जे पुरावे सादर केले ते त्याच्या म्हणण्याला खरे ठरवत आहेत. (Salman Khan Defamation Case) त्याचसोबत सलमानने त्याचा शेजारी केतन कक्क्डविरोधात कोर्टाकडे 'न्यायालयीन मनाई हुकूम'साठी परवानगी मागितली होती त्यालादेखील कोर्टाने रद्द केले आहे.
कक्कड यांना इलेक्ट्रिसिटीची अडचण निर्माण करण्यात आली - केतन कक्कडच्या वकिलांचे याबाबतीत म्हणणे आहे, की सलमानने आपल्या फार्महाऊसभोवती जो लोखंडाचा मजबूत गेट करुन घेतलाय तो केतनच्या जमिनीवर आहे. त्यामुळे केतनला आपल्या जमिनीचा पूर्ण वापर करता येत नाही. (Salman Khan's case against his neighbor) त्या जमिनीवर केतनचे मंदिर आहे. पण सलमानने त्या जमिनीवर येण्यास मनाई केल्याने ते साधे देवदर्शनही करू शकत नाहीत. एवढेच नाही तर कक्कड यांना इलेक्ट्रिसिटीचीही अडचण सलमानतर्फे निर्माण करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार दाखल केली असून त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी चौकशी केली जात आहे.
पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी केस - यासंदर्भातल्या छोट्या-छोट्या अनेक केसेस संबंधित कोर्टात सुरु असल्याचे केतन कक्कडच्या वकिलांनी म्हटले आहे. सलमानच्यामागे केसेसचा ससेमिरा सुरुच आहे. एका केसमधून सुटतोय तर दुसरी केस डोक वर काढत आहे. आता पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी त्याला ५ एप्रिलला अंधेरी कोर्टात हजर राहण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले होते. ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच शेजाऱ्याविरोधातल्या केसमध्येही त्याला हार पत्करावी लागत आहे असे चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा - Loudspeakers at Religious Places : 'धार्मिक स्थळांवरून ध्वनी प्रदूषण करणे हा गुन्हाच'