मुंबई - सचिन वाझेचं कथित पत्र व्हायरल झाले आहे. या पत्राच्या माध्यमातून सचिन वाझेकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला असून बीएमसीतील खासगी कंत्राटदारांकडून पैसे वसूली करण्याचा अनिल परब यांच्याकडून दबाव असल्याचे म्हटले होते.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे.
सचिन वाझे यांनी मीडियाला ३ पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी २ कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचे आरोप केले आहे.
हे कथित पत्र ३ पानांचे आहे. महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे.