ETV Bharat / city

रशियात -युक्रेन युद्धाचा देशातील मालवाहतुकीला फटका; केंद्र- राज्य सरकराने कर कपात करावी -  बाल मल्कित सिंह - मालवाहतूक

इंधन दर वाढ झाली (Fuel price increased due Russia Ukraine Conflict) तर या खर्चात वाढ होईल. हा खर्च सर्वसामान्य खिश्यातून नाइलाजास्त वसूल करावे लागेल. सर्वसामान्यांचा डोक्यावर अतिरिक्त बोजा बसेल अशी माहिती, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी दिली आहे.

transport
transport
author img

By

Published : Mar 13, 2022, 10:49 AM IST

मुंबई - रशिया-युक्रेनचा फटका (Russia Ukraine Conflict) देशातील इंधन वाढीला बसणार आहे. त्यामुळे नाइलाजास्त मालवाहतूक खर्च वाढल्याने, त्याचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडण्याची भीती ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी व्यक्त केली आहे.

बाल मल्कित सिंह प्रतिक्रिया
तर खर्चात होणार वाढ
कोराेनामुळे जनतेचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच वाढणाऱ्या इंधनाच्या (डिझेल) दरामुळे देशभरातील मालवाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आता सततच्या इंधन दरवाढीमुळेही मालवाहतूकदार त्रस्त झाले आहेत. काही महिन्यापूर्वीच केंद्र सरकारने इंधनाच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना देखील पेट्रोल आणि डिझेलवर लागू असलेला मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद अनेक राज्याने दिला आहे. त्यात आता मालवाहतूकदारचा व्यवसाय रुळावर येत असतानाच रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा परिणाम जगभरात जाणवत आहे. कच्च्या तेलाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी देशात सुद्धा इंधन दर वाढीची शक्यता वर्तवली जात आहेत. देशात इंधन दर वाढले तर देशभरातील मालवाहतूकदारांना मोठा फटका बसणार आहे.एकूण खर्चापैकी मालवाहतूकीवर ६५ टक्के खर्च येतोय. इंधन दर वाढ झाली तर या खर्चात वाढ होईल. हा खर्च सर्वसामान्य खिश्यातून नाइलाजास्त वसूल करावे लागेल. सर्वसामान्यांचा डोक्यावर अतिरिक्त बोजा बसेल अशी माहिती, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी दिली आहे.
इंधनावरील करात कपात करावीत -
देशाचा कोरोनाचे संकट असताना आधीच ट्रान्सपोर्ट व्यवस्था बंद होती. आता कुठे कोरोना प्रादुर्भाव कमी होताच मालवाहतूक सुरु होत असताना ट्रान्सपोर्ट व्यवसायाला उभारी मिळाली होती. मात्र, रशिया - युक्रेन युद्धामुळे इंधन वाढ होत माल वाहतूक व्यवसायाला फटका बसणार आहे. अशात केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या इंधनावरील करात कपात करत ही इंधन वाढ आटोक्यात कशी येईल यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा - Nirin Gadkari Nagur : 'विदर्भात गारमेंट क्लस्टर उभारणारची गरज'; तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.