ETV Bharat / city

RTE Admission in Mumbai : मुंबईत पुन्हा आरटीई प्रवेशाची 30 जुलैपर्यंत मुदत वाढ

आरटीई प्रवेशाची मुदतवाढ( RTE Admission Deadline Extended ) मुंबई स्तरावर 30 जुलैपर्यंत करण्यात आलेली आहे. राज्यात आणि मुंबईच्या पातळीवर तिसऱ्यांदा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यभरात यासाठी 2 लाख 82 हजार 783 म्हणजेच जागेपेक्षा दुपटीने तिपटीने अर्ज प्राप्त झालेले आहे. मात्र, प्रवेश झालेले नाहीत.

RTE Admission
RTE Admission
author img

By

Published : Jul 28, 2022, 12:16 PM IST

मुंबई - आरटीई प्रवेशाची मुदतवाढ( RTE Admission Deadline Extended ) मुंबई स्तरावर 30 जुलैपर्यंत करण्यात आलेली आहे. शिक्षण अधिकार कायदाअंतर्गत 25% सामाजिक आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश राखीव ठेवण्यात येतात. राज्यात आणि मुंबईच्या पातळीवर तिसऱ्यांदा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्यापही जेवढ्या रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागांसाठी तितक्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्राप्त झाले नसल्यामुळे मुंबई स्तरावर देखील आरटीची मुदत वाढ 30 जुलैपर्यंत देण्यात आलेली आहे.

39 हजार 114 जागा रिक्त - शिक्षण अधिकार कायदा 2009 अंतर्गत कलम 12 (1) सी अनुसार देशात राज्यात आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विनाअनुदानित खाजगी माध्यमाच्या शाळांमध्ये 25% प्रवेश इयत्ता पहिलीसाठी राखीव ठेवण्यात येतात. या योजनेत सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना इयत्ता पहिली मध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. शिक्षण अधिकार कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत मोफत सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे. परंतु विनाअनुदानित खासगी शाळांना ( to unaided private schools ) त्यातील एकच कलम 12 एक सी हे लागू आहे आणि त्यानुसार हे 25% चे प्रवेश दरवर्षी भरले जातात. यंदा महाराष्ट्रात आर टी साठी चे प्रवेश साठी 9086 शाळा आहेत आणि या शाळांमध्ये रिक्त विद्यार्थ्यांसाठीच्या जागा एक लाख एक हजार नऊशे सहा इतके आहेत. तर राज्यभरात यासाठी अर्ज जे आलेले आहेत त्यांची संख्या दोन लाख 82 हजार 783 म्हणजेच जागेपेक्षा दुपटीने तिपटीने अर्ज प्राप्त झालेले आहे. तर या प्राप्त अर्जांमधून 1 लाख 23 हजार 951 इतक्या अर्जांची निवड झाली आहे आणि त्यापैकी केवळ 78,780 इतके विद्यार्थी पहिलीसाठी प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यात प्राप्त ठरलेले आहेत.

जागा रिक्त असल्याने मुदवाढ - मुंबई स्तरावर आरटीईअंतर्गत एकूण शासनाने ठेवलेल्या रिक्त जागा 6,451 इतक्या आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष प्रवेश नक्की झालेले आहेत साधारणता साडेतीन हजाराच्या आसपास. त्यामुळे अद्यापही रिक्त जागेवर पूर्ण प्रवेश झाले नसल्यामुळे पुन्हा मुदतवाढ करण्याची पाळी मुंबई स्तरावर देखील आलेली आहे.
मुंबई शहर पातळीवर आरटीईसाठीचे 282 शाळा आणि त्यासाठीच्या रिक्त जागा 5281 आहेत. त्यासाठी एकूण 15050 अर्ज आले. त्यापैकी 4183 निवड झालेले अर्ज आहेत.

अर्ज आले मात्र प्रवेश नाही - मुंबई उपनगरमध्ये 59 रिक्त जागा असून त्यासाठी 59 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये रिक्त विद्यार्थ्यांसाठीच्या जागा 1170 इतकी आहे. एकूण किती अर्ज आले त्याबद्दलची माहिती अद्याप मुंबई शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेली नाही. मात्र निवड झालेल्या अर्जांची संख्या 1159 आणि प्रत्यक्ष प्रवेश झालेले आहेत. 827 याचाच अर्थ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून सुमारे सव्वा तीन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश नक्की झाल्याचं एकूण माहिती समोर येत आहे. मुंबई स्तरावर आणि एकूण रिक्त जागांसाठी भरपूर अर्ज आलेले असताना प्रवेश मात्र तेवढे झाले नाही. यामुळेच मुंबई स्तरावर आर टी च्या प्रवेशाची मुदत दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिका ( Mumbai Municipal Corporation ) शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - Deep Amavasya : दीप अमावस्या म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय ? कशी साजरी करतात? जाणून घ्या सोप्या पद्धतीने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.