ETV Bharat / city

RS Election 2022 : महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा विजय खडतर? - MIM BVA Decided To Vote MVA

राज्यसभा निवडणुकीत ( RS Election 2022 ) अर्धे मतदान झाले असताना आता महाविकास आघाडीच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा विजय खडतर झाल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.

RS Election 2022
RS Election 2022
author img

By

Published : Jun 10, 2022, 1:46 PM IST

मुंबई - राज्यसभा उमेदवार ( RS Election 2022 ) निवडून येण्यासाठी ते 42 मतांचा कोटा प्रत्येक उमेदवाराला लागणार आहे. त्यामुळे आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी 42 मतं निश्चितपणे उमेदवाराला मिळतील याची काळजी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष घेत होते. मात्र, आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी घेतलेल्या रणनीतीत बदल करून हा कोटा 44 केल्याची माहिती समोर येत आहे. 44 मतदान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या उमेदवाराला दगाफटका झाल्यास त्याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या चौथ्या आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून 44 मतांचा कोटा आपल्या उमेदवाराला देऊन त्यांचा विजय निश्चित करण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून केला जातोय. जेणेकरून मतदान करताना काही कारणावरून एखाद-दुसरं मत बाद झालं तर, काँग्रेसचे इमरान प्रतापगडी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना कोणताही धोका होऊ नये. त्यांचा विजय निश्चित व्हावा यासाठी हा कोटा दोन्ही पक्षाकडून वाढवण्यात आल्याचे समजते.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या निर्णयाने शिवसेना नाराज? : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकासआघाडी रणनीती ठरवली गेली. यातून महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या मताने विजय मिळेल. याबाबत रणनीती होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने 42 चा कोटा 44 वर नेल्यामुळे आता चौथ्या उमेदवारासाठी दुसऱ्या पसंतीच्या मताची देखील दक्षता महाविकास आघाडीला घ्यावी लागणार आहे. रणनीतीत झालेल्या बदलामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन्ही पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. मात्र तिन्ही पक्षाकडून संजय राऊत, प्रफुल पटेल आणि इमरान प्रतापगडी यांच्या विषयी मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर राज्यसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे निरीक्षण करणारे नेते मतांची पुन्हा एकदा गोळाबेरीज करून चौथ्या उमेदवाराच्या मतदानाची रणनीती आखणार आहेत. जेणेकरून महाविकास आघाडीचा चौथा उमेदवारही विजय होईल. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदारांच्या मताचा कोटा बदलल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून जाहीरपणे नसलं तरी दबक्या आवाजात दोन्ही पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

पक्ष आणि लहान पक्षाच्या मदतीची आशा : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सोबत 12 अपक्ष आमदार त्यांच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, यासोबतच लहान पक्षांची नाराजी महाविकास आघाडीवर असल्यामुळे ते कोणाला मत देणार याबाबत चर्चा अंतिम क्षणापर्यंत सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी महा विकास आघाडीला मतदान करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर आज सकाळी एमआयएम देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार असे स्पष्ट केले आहे. मात्र हा विकास आघाडी सरकार मध्ये सामील असलेला लहान पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडीने अध्यापन आपली तीन मतं कोणाच्या पारड्यात टाकणार याबाबत स्वच्छता आणलेली नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पडावी यासाठी महाविकास आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.

44 कोटा केल्यामुळे असं बदलणार गणित : महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्षाच्या एकूण आमदार यामध्ये शिवसेनेचे 56 राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आणि काँग्रेसचे 44 असे एकूण 132 आमदार आहेत. यापैकी 44 च्या मतदान कोट्यानुसार तीन राज्यसभा उमेदवारांना 132 मते लागणार आहेत. त्यामुळे हे मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीकडे आपल्या आमदारांची 22 मते उरणार आहेत. यात महाविकास आघाडीसोबत असलेल्या 12 अपक्ष आमदारांनी खुला पाठिंबा दिला आहे. तर समाजवादी आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन्ही आमदार महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे आता पर्यंत 37 मते महाविकास आघाडीकडे आहेत असे चित्र आहे. त्यातच बच्चू कडू आणि बहुजन विकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पाडण्यात मआविला यश आल्यास त्यांचा चौथा उमेदवार देखील पहिल्याच पसंतीच्या मताने सहज निवडून येईल. तसेच हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना त्यांच्यासोबत असल्याने ही मते त्यांच्या पारड्यात पडतील असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे.

हेही वाचा : RS Election 2022 : महाविकास आघाडीला 'बूस्टर डोस'.. एमआयएमचा पाठिंबा.. भाजपचा 'खेळ' बिघडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.