ETV Bharat / city

Rohit Pawar reaction on pen-drive : 'तंत्रज्ञानाचा वापर नेमका कसा करावा हे भाजपाला चांगलेच माहित आहे'

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जे कागदपत्र पुरावे, ऑडिओ व्हिडीओ क्लिप ठेवले. त्याबाबत राज्य सरकार कडून त्याची सत्यता आणि पडताळणी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांनी दिली.

Rohit Pawar
Rohit Pawar
author img

By

Published : Mar 9, 2022, 11:57 AM IST

Updated : Mar 9, 2022, 12:31 PM IST

मुंबई : भाजपच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकारी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असून सव्वाशे तासांच व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह ( Devendra Fadnavis pen drive bomb ) असल्याचा दावा त्यांनी ( Opposition leader Devendra Fadnavis accuses ) सभागृहात केला आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली.

आमदार रोहित पवार रोहित पवार यांची प्रतिक्रिया

आमदार रोहित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पुरावे तयार केले जातात. काल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जे कागदपत्र पुरावे, ऑडिओ व्हिडीओ क्लिप ठेवले. त्याबाबत राज्य सरकार कडून त्याची सत्यता आणि पडताळणी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे पुरावे पेन ड्राईव्हच्या ( Devendra Fadnavis accuses ) माध्यमातून विधानसभा उपाध्यक्ष यांना दिले. त्यानंतर लगेचच ते प्रसार माध्यमांत जवळही देण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणात संशय निर्माण होतोय. पेगॅसेस सारखी टेक्नॉलॉजी वापरून पुरावे तयार करता येतात.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप अशाच टेक्नॉलॉजीतून तयार केल्या आहेत का? याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. सामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून असे आरोप केले जात आहेत. दहशतवाद्यांशी संबंध दाखवून नवा मलिक यांचा देखील राजीनामा मागण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. तंत्रज्ञानाचा वापर नेमका कसा करावा हे भाजपाला चांगलेच माहीत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब; सरकारी वकील आणि पोलिसांकडून षडयंत्र सुरू असल्याचा विधानसभेत गंभीर आरोप

Last Updated : Mar 9, 2022, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.