ETV Bharat / city

विमान इंधनापेक्षा पेट्रोल-डिझेल महाग; सामनातून पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा - सामनातून पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा

इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यावरून आज सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे, असे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

saamana editorial
saamana editorial
author img

By

Published : Oct 19, 2021, 7:54 AM IST

Updated : Oct 19, 2021, 2:03 PM IST

मुंबई - गेल्या महिन्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यावरून आज सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे, असे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे. तसेच विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले असल्याचा खोचक टोलाही केंद्र सरकारला लगावण्यात आला आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या संपादकीयमध्ये -

केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे. आता तर विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले. इंधनाची ही 'हवा-हवाई" दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. 'बहोत हो गयी महंगाई की मार...' अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा 'मार' मुकाटय़ाने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती तरी दुसरे काय उरले आहे, असा प्रश्न सामनाच्या संपादकीयमधून उपस्थित करण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेलची दररोज होणारी दरवाढ आणि त्यामुळे उडालेल्या महागाईच्या भडक्‍्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे आता असह्य करून सोडले आहे. हा हा म्हणता पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरीचा आकडा ओलांडला आणि इंधनाच्या सलग होणाऱ्या दरवाढीमुळे साहजिकच मालवाहतुकीचा खर्च वाढून सर्वच क्षेत्रांत महागाईने आपले हातपाय पसरले. गेल्या तीन आठवडय़ांमध्ये तर तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱया या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे. मागच्या आठवडय़ात रविवारपर्यंत तर सलग चार दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली आणि इंधनाच्या दरांनी भलताच उच्चांक गाठला. विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इंधन महाग झाले, असा खोचक टोका केंद्र सरकारला लगावण्यात आला आहे.

एव्हीएशन टर्बाईन फ्युएल (एटीएफ) म्हणजेच विमान प्रवासासाठी लागणाऱ्या हवाई इंधनाच्या दरांना मागे टाकून बाईक व कारच्या इंधन दरांनी नवीन विक्रम नोंदविला आहे. हवाई वाहतुकीच्या इंधनाचा दर एका लिटरला 79 रुपये आहे आणि रस्ता वाहतुकीच्या वाहनांचा इंधन दर 105 ते 115 रुपयांहून अधिक झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दर हवाई इंधनापेक्षा थोडेथोडके नव्हे, तर तीस टक्‍क्‍यांनी महाग झाले आहेत. राजस्थानातील श्रीगंगानगर या सीमावर्ती शहरात पेट्रोल-डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत. तिथे एक लिटर पेट्रोलसाठी सुमारे 118 तर डिझेलसाठी 106 रुपये मोजावे लागतात. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई या महानगरांत आणि एकूणच देशाच्या कानाकोपऱ्यात थोड्याफार फरकाने पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास असेच आहेत. कॉंग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्यादरांनीसाठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत. पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत, असा टोलाही भाजपाच्या नेत्यांना सामनामधून लगावण्यात आला आहे.

हेही वाचा - Maharashtra Unlock : दिवाळीपूर्वी 'गोड' बातमी.. राज्यातील निर्बंध आणखी शिथील, उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार

Last Updated : Oct 19, 2021, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.