मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सोमवारी पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झालेल्या रिया चक्रवर्तीची तब्बल ९ तास चौकशी झाली. त्यानंतर ती ईडी कार्यालयातून बाहेर पडली. सोमवारी रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी या दोघांना समोरासमोर बसवून ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती. या दरम्यान रियाला ईडी अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले होते.
:रिया चक्रवर्ती हिला ईडी कडून विचारण्यात आलेले प्रश्न
रियाने गेल्या 2 वर्षात केलेल्या गुंतवणुकीबाबत ईडीकडून प्रश्न विचाण्यात आले. मुंबईतील खार येथील फ्लॅट साठी तिने 25 लाख रक्कम भरली होती, ही रक्कम कुठून आली, याचा स्रोत काय याबद्दल विचारणा रियाला करण्यात आली आहे. मयत सुशांतसिंहच्या बँक खात्यातून ट्रान्स्फर झालेला काही पैसा रियाला मिळाला होता. ते पैसे कुठे खर्च करण्यात आले याबद्दलचा खुलासा रियाला करावा लागला आहे.
रियाच्या 2 बँक खात्यात अचानक आलेल्या पैशांबद्दल रियाला ईडीकडून प्रश्न विचारण्यात आले होते. या बरोबरच , सुशांतसिंह राजपूत याने मृत्यूपूर्वी गेल्या 2 वर्षात केलेल्या गुंतवणुकीबाबत रियाला प्रश्न विचारण्यात आले. रिया व तिचा भाऊ शौविक हे संचालक असलेल्या कंपनी विषयी सविस्तर माहिती रियाला विचारण्यात आली. रिया व सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी या दोघांची ईडी समोरासमोर चौकशी करण्यात आली. सुशांतने सिद्धार्थसोबत मिळून कुठल्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते का याचीही चाचपणी ईडी करत आहे.