मुंबई - रेणू शर्मा या महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या आरोपानंतर मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. तर दुसरीकडे रेणू शर्मा यांनी आम्हालाही फसवल्याचा आरोप करत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनिष धुरी यांनी केला. त्यांच्या या आरोपांनतर रेणू शर्मा यांनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होत आहे.
'एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही'
याच कारणामुळे आपली बाजू मांडण्यासाठी रेणू शर्मा यांचे वकील अॅड. रमेश त्रिपाठी माध्यमांसमोर आले आणि विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, “रेणू यांच्यावरील आरोप केवळ मीडियातून आले आहेत. त्याबाबत कुणीही आम्हाला नोटीस दिलेली नाही. जेव्हा पोलिसांकडून नोटीस येईल, तेव्हा त्यावर बोलू. मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देऊ, मात्र, हे पुरावे मीडियाला देणार नाही. करूणा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. दोन्ही सख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी आपल्याला सातत्याने धमक्या येत असल्याचे सांगितले आहे. रेणू शर्मा यांची केस सोडा, अन्यथा जीवे मारू, असे धमकीचे फोन त्रिपाठी यांना येत आहेत. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती देत पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे.
'धमकावले जात आहे'
त्रिपाठी म्हणाले, “मला धमक्या देण्यात येत आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजल्यापासून धमक्या दिल्या जात आहेत. तुम्ही केस सोडा, त्यांच्याविरोधात केस लढू नका, असे धमकावले जात आहे.