मुंबई - शिवसेना-भाजपा युती असताना भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फसवणूक केल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी या फसवणुकीची बाबत स्पष्टता केली नसली तरी नेमकी काय फसवणूक भाजपाने केली याबाबत जाणकार यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी होय, ती फसवणूकच - योगेश त्रिवेदी - शिवसेना-भाजपची युती होत असताना १९८९ मध्ये तत्कालीन भाजप नेते प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात अनेकदा चर्चा झाली. या चर्चेनुसार 117 जागा भाजपा आणि 171 जागा शिवसेनेने लढवण्याचे ठरवले. जास्त जागा मिळाल्यामुळे शिवसेनेचा वरचा हात आहे, असे मानले जात होते .प्रत्यक्षात मात्र भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा दिल्या. त्या काळात काँग्रेसचा दगड जरी उभा केला तरी निवडून येईल अशी परिस्थिती असलेल्या जागी शिवसेनेला जास्त जागा देऊन भाजपाने एक प्रकारे फसवणूक केल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी व्यक्त केले आहे. तर विदर्भात शिवसेनेला जागा न देता भाजपाने अनेक जागा स्वतःकडे घेतल्या याचा परिणाम म्हणून निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या 52 तर भाजपच्या कमी जागा लढवून 42 जागा निवडून आल्या होत्या. हेच सूत्र पुढे चालू राहिले. 2014 मध्ये जेव्हा शिवसेनेच्या हे लक्षात आले. तेव्हा त्यांनी 151 पेक्षा अधिक जागा मागत जागांची अदलाबदल करण्याचा आग्रह धरला, मात्र भाजपाने हे मान्य केले नाही, आणि म्हणूनच युती तुटली. त्यामुळे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, असे त्रिवेदी यांचे म्हणणे आहे. तर बाबरी मज्जिद पाडण्यामध्ये शिवसैनिकांचा सहभाग असल्याचे सर्वश्रुत आहे. मोरेश्वर सावे यांच्यावर अनेक केसेस झाल्या. इतकेच काय पत्रकार संजय राऊत आणि संजय डहाळे यांना सुद्धा लखनऊ न्यायालयाकडून समन्स आले होते, असे त्रिवेदी सांगतात.
युतीचे वाटप ही तत्कालीन काळाची गरज - एकनाथ खडसे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे तत्कालीन मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले की, शिवसेना त्यावेळी ग्रामीण भागात पोहोचली नव्हती शाखा हळूहळू उघडत होत्या. तर भाजपा ग्रामीण भागात होती. मात्र शहरात त्यांना फारसा आधार नव्हता म्हणूनच काळाची गरज म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्र आली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. शिवसेना आणि भाजपचे हिंदुत्व काही वेगळे नव्हते, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी व्यक्त केली. सुरुवातीला ग्रामीण भाग भाजपाने घ्यावा यासाठी 117 जागा आणि शिवसेनेला 171 जागा देण्यात आल्या. मात्र, लोकसभा हे भाजपाचे उद्दिष्ट असल्याने भाजप बत्तीस आणि शिवसेनेने 14 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विधानसभेच्या जागा तितक्याच राहिल्या तरी ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद वाढू लागल्याने त्यांनी 22 जागा लोकसभेच्या लढविण्यावर एकमत झाले. हे सर्व दोन्ही नेत्यांच्या विचारांनी होत होते त्यामुळे याच्यात कुणाला फसवले गेले आहे, असे मला वाटत नाही असे सुरूवातीपासून युतीच्या चर्चांमध्ये सहभागी असलेले एकनाथ खडसे सांगतात. मात्र मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला जर काही वेगळे संदर्भ असतील तर ते त्यांनी स्पष्ट केल्यावरच त्याबाबत प्रतिक्रिया देता येईल, असेही खडसे म्हणाले.
युतीमध्ये कोणी कोणाला फसवू शकत नाही - जोशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भाजपने फसवले असे विधान केले आहे. यापूर्वीही त्यांनी युतीमध्ये आम्ही पंचवीस वर्ष सडलो असे विधान केले आहे. वास्तविक जेव्हा दोन राजकीय पक्ष एकमेकांशी युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेतात तेव्हा तर दोन्ही पक्षांना आपली शक्ती स्थळ आणि कमकुवत बाजू या दोन्हींचा अंदाज असतो. त्या अंदाजाच्या बळावरच हे दोन्ही पक्ष एकत्र येतात आणि वाटाघाटी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतात. त्यानुसारच या दोन्ही पक्षांनी परस्परांच्या ताकदीचा अंदाज घेत त्याच्या वेळेनुसार घेतलेले निर्णय असतात. त्यामुळे युतीमध्ये कोणी कोणाला फसवलं, असं म्हणण्याची शक्यता फार कमी असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे. हिंदुत्वाचा आणि राम मंदिर निर्माणाचा मुद्दा या दोन मुद्द्यांवर हे दोन पक्ष एकत्रआले कारण या मुद्द्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा होता. पण आता नव्या राजकिय परिस्तीती केवळ आपण युतीत श्रेष्ठ होतो असे दाखवण्याचा यादोन्ही पक्षांचा प्रयत्न असल्याचेही जोशी सांगतात.