ETV Bharat / city

पालिका सभागृहात उंदीर, मग मुंबई कशी स्वच्छ ठेवणार? - rats in mumbai municipal corporation

सोमवारी (१०फेब्रुवारी) सभागृहात कचरा व्यवस्थापनावर चर्चासत्र सुरू झाले. यावेळी भाजप नगरसेविका सेजल देसाई यांनी सभागृहात उंदीर असल्याचे निदर्शनास आणले. मागील बाजूस बसलेल्या नगरसेवकांच्या पायाखाली उंदीर फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.

rats in BMC
शहराच्या स्वच्छतेचे नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या मुख्यालयातील सभागृहात उंदीर फिरत असल्याचे भाजपने निदर्शनात आणले आहे.
author img

By

Published : Feb 11, 2020, 9:26 PM IST

मुंबई - शहराच्या स्वच्छतेचे नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या मुख्यालयातील सभागृहात उंदीर फिरत असल्याचे भाजपने निदर्शनास आणले आहे.

शहराच्या स्वच्छतेचे नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाच्या मुख्यालयातील सभागृहात उंदीर फिरत असल्याचे भाजपने निदर्शनात आणले आहे.

सोमवारी (१०फेब्रुवारी) सभागृहात कचरा व्यवस्थापनावर चर्चासत्र सुरू झाले. यावेळी भाजप नगरसेविका सेजल देसाई यांनी सभागृहात उंदीर असल्याचे निदर्शनास आणले. मागील बाजूस बसलेल्या नगरसेवकांच्या पायाखाली उंदीर फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित बाब अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निदर्शनास आणल्याची माहिती देसाई यांनी दिली. तसेच सभागृहाची स्वच्छता ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत देशभरातील स्वच्छता ठेवणाऱ्या पालिकांना पुरस्कार देण्यात येतात. या स्पर्धेत मागील चार वर्षे इंदौर पालिका पहिला क्रमांक मिळवत आहे. यामुळे मुंबईतदेखील हा पॅटर्न राबवण्यात यावा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली आहे. तसेच कचरा व्यवस्थापनावर नगरसेवकांना सूचना करण्यासाठी विशेष सभागृह बोलावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पालिकेचे कामकाज चालत असलेल्या ठिकाणीच उंदीर फिरत असल्यास या ठिकाणी बसून स्वच्छतेचे धोरण ठरवण्यात काय अर्थ, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:मुंबई - मुंबईची स्वच्छता ज्या प्रशासनाकडून केली जाते त्या पालिका प्रशासनाच्या मुख्यालयातील सभागृहात उंदीर फिरत असल्याचे भाजपाकडून निदर्शनात आणण्यात आले आहे. जर पालिका सभागृहात उंदिर फिरत असतील तर मुंबई स्वच्छ कशी ठेवली जाऊ शकते असा प्रश्न भाजपाकडून विचारण्यात आला आहे. Body:केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छता ठेवणाऱ्या देशभरातील पालिकांना पुरस्कार दिले जात आहेत. या स्पर्धेत गेले चार वर्षे इंदोर पालिका पहिला क्रमांक मिळवत आहे. यामुळे मुंबईत इंदोर पॅटर्न राबवावा अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली आहे. त्यासाठी कचरा व्यवस्थापनावर नगरसेवकांना सूचना करता याव्यात म्हणून विशेष सभागृह बोलावण्यात आले आहे. काल सोमवारपासून नगरसेवकांकडून कचऱ्यावर चर्चा केली जात आहे. यावेळी भाजपा नगरसेविका सेजल देसाई यांनी सभागृहात उंदिर असल्याचे निदर्शनास आणले.

सोमवारपासून पालिका सभागृहात कचरा व्यवस्थापनावर चर्चा सुरू आहे. यावेळी सायंकाळी सभागृहाच्या मागील बाजूस बसलेल्या नगरसेवकांच्या पायाखाली उंदिर फिरत होता. उंदिर फिरत असल्याने मी भीतीने उभी राहिले. मात्र महापौरांना मी बोलण्यासाठी उभी राहिले असे वाटल्याने त्यांनी मला खाली बसण्यास सांगितले. मी सभागृहात उंदिर असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निदर्शनास आणल्याचे देसाई यांनी सांगितले. पालिका सभागृहात कोणीही जेवण आणत नाही तरीही या ठिकाणी उंदिर आले कुठून असा प्रश्न उपस्थित करत सभागृहाची स्वच्छता ठेवणाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देसाई यांनी केली. पालिकेचे कामकाज ज्या ठिकाणाहून चालते त्याच ठिकाणी जर उंदिर फिरत असतील तर त्याठिकाणी बसून मुंबईच्या स्वच्छतेच्या गोष्टी कशा करायच्या असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

बातमीसाठी भाजपा नगरसेविका सेजल देसाई यांची बाईट Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.