मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्तांच्या 100 कोटीची मागणीची लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून भाजपने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने सुरू केली आहेत.
नगराध्यक्ष ज्योत्स्ना हसनळे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन-
काशिमीरा परिसरातील भाजप नेते अनिल भोसले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी निषेध करत अनिल देशमुख यांच्याविरोधात निदर्शने केली आणि राजीनामा देण्याची मागणी केली. यावेळी, जरिमरी तलावाजवळ मीरा भाईंदर नगराध्यक्ष ज्योत्स्ना हसनळे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या मोर्चामध्ये भाजपा नेते अनिल भोसले, महापौर ज्योत्स्ना हसनळे, नगरसेविका मीरा देवी, अनिल तट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा- वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट; काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान