ETV Bharat / city

'कमळा'वर नाही, तर पक्षाच्याच चिन्हावर लढवणार निवडणूक - महादेव जानकरांची घोषणा

राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित दादर शिवाजी पार्क येथे कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर याची प्रमुख उपस्थित आहे.

महादेव जानकर
author img

By

Published : Aug 25, 2019, 4:31 PM IST

Updated : Aug 25, 2019, 5:24 PM IST

मुंबई - राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित दादर शिवाजी पार्क येथे कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर याची प्रमुख उपस्थित आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अंत्यविधीसाठी अनेक नेतेमंडळी व मुख्यमंत्री गेले असल्याने त्यांची महामेळाव्यात गैरहजेरी असल्याचे जानकर यांनी सांगितले.

महामेळाव्यात बोलताना जानकर म्हणाले की, मी संपुर्ण आयुष्य पक्ष बनवण्यासाठी खर्ची केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक माझ्या पक्षाच्याच चिन्हावर लढवणार आहे. युती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मराठा आरक्षणाचा प्रश्न या सरकारने मार्गी लावला. धनगर समाजासाठी 22 योजना लागू केल्यात. 1 हजार कोटींची तरतूद धनगर समाजासाठी केली. तसेच धनगर समाजाला हेच सरकार आरक्षण देऊ शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये ओबीसी आणि धनगर समाजाची अवस्था बिकट होती. परंतु भाजप सरकारने या समाजाला राजकीय वाटही उपलब्ध करुन दिली. म्हणून फडणवीस सरकारला पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

जानकर साहेब आता लग्न करु नका - पंकजा मुंडे
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महामेळाव्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे जानकरांना म्हणाल्या की, 'जानकर साहेब मोदीजींचे बघा. लग्न न करता देशच त्यांचा परिवार झाला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा आता लग्न करु नका व त्यांच्यासारखा परिवार तयार करा' असा, सल्ला जानकरांना दिला. तसेच जेवढी मी भाजपमध्ये आहे तेवढीच रासपमध्ये असल्याची कबुली मुंडेनी दिली. 16 वे वर्ष धोक्याचे असते आणि हा 16 वा वर्धापनदिन आहे. त्यामुळे हे 16 वे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याचे वर्ष ठरणार आहे. आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचा अल्याचेही मुंडे म्हणाल्या.

अभिनेता संजय दत्तचा रासप प्रवेश 25 सप्टेंबरला...
अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. आजच्या महामेळाव्यात संजय दत्तचा प्रवेश होणार असल्याची देखील माहिती होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे संजय दत्तच्या रासप प्रवेशावर जानकर काय बोलतात, यावर लक्ष लागून राहिले होते. अखेर अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबरला रासप प्रवेश करणार असल्याचे जानकर यांनी जाहीर केले. त्यामुळे संजय दत्तचा रासप प्रवेश निश्चित मानला जात आहे. शिवाय दौंडची जागा आम्हाला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाला 14 जागा मिळाल्या तरच रासपला मान्यता मिळणार असल्याचे जानकर म्हणाले.

Intro:Body:

फ्लश

राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित दादर शिवाजी पार्क येथे कार्यकर्त्यांचा महामेळावा ठेवण्यात आला आहे.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उपस्थित राहत दिल्या राष्ट्रीय समाज पक्षाला शुभेच्छा

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित

ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आगमन

काही वेळातच पंकजा मुंडे करतील उपस्थितींना संबोधित

Conclusion:
Last Updated : Aug 25, 2019, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.