ETV Bharat / city

Rashmi Thackeray At Tembhi Naka: एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची 'एन्ट्री'; टेंभी नाक्यावर घडलं 'असं' काही

Rashmi Thackeray At Tembhi Naka: ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात Navratri Festival रश्मी ठाकरे Rashmi Thackeray यांनी हजेरी लावली. ठाकरे आणि शिंदे गटाच्यावतीने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

Rashmi Thackeray Tembhi Naka
Rashmi Thackeray Tembhi Naka
author img

By

Published : Sep 29, 2022, 5:31 PM IST

Updated : Sep 29, 2022, 6:47 PM IST

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात Navratri Festival रश्मी ठाकरे Rashmi Thackeray यांनी हजेरी लावली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. Rashmi Thackeray At Tembhi Naka धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांनी सुरु केलेल्या आणि आता एकनाथ शिंदे (cm Eknath shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या टेंभी नाका नवरात्रोत्सवाला (Navratri Festival Tembhi Naka) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आज (29 सप्टेंबर) भेट दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात टेंभी नाक्यावर शिवसेना महिला आघाडीने आयोजित केलेल्या महाआरतीच्या अगोदर रश्मी ठाकरे यांच्याकडून देवीची आरती करून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. देवाच्या दारी कोणताही वाद नको, म्हणून दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या वेळी आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रश्मी ठाकरे हे वर्षानुवर्षे या ठिकाणी येत असल्याचे मतदार सूज्ञ असल्याप्रमाणे देव ही सुज्ञ असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. रश्मी ठाकरे यांनी मीडियाशी बोलणे टाळले. रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी आल्या असताना सर्वात पहिल्यांदा त्यांनी टेंभी नाक्यावरील पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी आनंद आश्रमाला भेट देत त्यांनी आश्रमातील आनंद दिघे यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन देखील केले.

टेंभी नाका देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून मोठी गर्दी टेंभी नाका परिसरात केलेली पाहायला मिळाली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या महिला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. दोन्ही गट यावेळी शक्ती प्रदर्शन केले जात होते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे.

गर्दीमुळे वाहतूक कोंडी मात्र रुग्णवाहिकेला दिली वाट मात्र यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका देखील अडकली होती. मात्र पोलिसांच्या विनंतीला मान देत लागलीच महिलांनी या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली, आणि पुन्हा शक्तीप्रदर्शन सुरू झाले. या प्रकारातून महिलांमधील माणुसकीचे दर्शन घडले. देवीच्या मंडपात आणि मंडपाबाहेर रस्त्यावर मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली. या महिलांमध्ये मुंबई ठाण्यातील महिला आघाडीच्या नेत्या आणि कार्यकर्ते पाहायला मिळाले.

वाहतूक कोंडीचा फटका रश्मी ठाकरेंना ही या संपूर्ण परिसरात नवरात्रीच्या सुरवातुपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. कारण काही मार्ग बंद करण्यात आले आहेत, तर वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील सर्वच रस्त्यांवर मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. यातूनच वाट काढत येण्यासाठी रश्मी ठाकरे यांना ही वेळ लागला आणि त्यांना ही या कोंडीचा फटका बसला.

रश्मी ठाकरे यांनी दिली आनंदाश्रमाला भेट आज ठाण्यात आनंदाश्रमात सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. रश्मी ठाकरे यांनी आनंदाश्रमाला भेट देण्याआधी शिंदे गटाचे मंत्री शंभू राजे दिघे यांनी आनंदाश्रमाला भेट दिली होती.

काय होत्या घोषणा आज टेंभी नाक्यावर रश्मी ठाकरे आल्या असताना महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यात सेनेच्या दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आनंद दिघे साहेब अमर रहे बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा दिल्या. यावेळी काही महिला फुगड्या घालताना ही दिसल्या. उद्धव ठाकरे जिंदाबाद आणि आदित्य ठाकरे जिंदाबाद या घोषणाही महिला कार्यकर्त्या देत होते.

पोलिसांचे हाल सुरूच नवरात्रीच्या सुरवातीपासून देवी आगमनापासूनच पोलिसांची बंदोबस्त आणि वाहतुक कोंडी सोडवताना अहोरात्र दमछाक झालेली पाहायला मिळाली. अनेक मंत्री आणि लाखो भाविक या ठिकाणी येत असल्यामुळे या परिसरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे या परिसरात पोलिसांचे मोठे हाल झाल्याचे दिसले.

बाळासाहेब आणि मीनाताई देखील लावायच्या हजेरी या ठिकाणी टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी आनंद दिघे आयोजन करत असताना बाबासाहेब ठाकरे हे मीनाताई ठाकरे हे देखील देवीची ओटी भरण्यासाठी येत होत्या आणि त्यावेळी त्यांना पाहायला मोठी गर्दीही व्हायची. आज या टेंभी नाक्यावरील गर्दी पाहिल्यावर काही महिलांनी त्यावेळची आठवण करून दिली.

Last Updated : Sep 29, 2022, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.