ETV Bharat / city

Phone Tapping Case : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण; संजय राऊतांचा जबाब नोंदवला

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांनी राज्यातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप ( Phone Tapping Case ) केले होते. त्याप्रकरणी आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला ( Mumbai Police Recorded Sanjay Raut Statement ) आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Apr 9, 2022, 7:09 PM IST

मुंबई - आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांनी राज्यातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप ( Phone Tapping Case ) केले होते. त्याप्रकरणी आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला ( Mumbai Police Recorded Sanjay Raut Statement ) आहे. कुलाबा पोलिसांनी हा जबाब नोंदवला आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता.

राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन आणि मुंबईत कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतील होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांना दिलासा दिला होता. त्याप्रकरणाचा तपास सुरु असून, आता एकनाथ खडसे आणि संजय राऊतांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण? - रश्मी शुक्ला यांनी एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यात काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू, एकनाथ खडसे, संजय यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. आता या प्रकरणावरून ठाकरे सरकारने चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा - Corona Vaccine : मोठी बातमी, कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लसीच्या किंमतीत मोठी घट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.