ETV Bharat / city

Ramesh Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, अभिनयाचा देव हरपला

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईत रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.

रमेश देव
रमेश देव
author img

By

Published : Feb 2, 2022, 9:15 PM IST

Updated : Feb 2, 2022, 10:26 PM IST

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतल्या शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. देव यांनी त्यांच्या सिने कारकिर्दीत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

रमेश देव यांची कारकीर्द

रमेश देव हे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. १९७१ साली आलेल्या आनंद आणि ताकदीर या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांचा जन्म अमरावतीत झाला. त्यांचे आजोबा हे अभियंता होते तर वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. रमेश देव यांनी १९५१ मध्ये बाल कलाकार म्हणून पाटलाची पोर या चित्रपटात पहिल्यांदा भूमिका केली. आरती हा त्यांचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट होता. त्यांनी दिग्दर्शन आणि अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी जवळपास २५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी सीमा देव, अभिनेते पुत्र अजिंक्य देव तसेच दिग्दर्शक पुत्र अभनय देव आणि त्यांचे कुटुंबिय आहेत.

राजकारणातही रमेश देव यांनी आपली झलक दाखवली होती. रमेश देव यांनी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवली होती. १९९६ साली ते लोकसभा निवडणुकीला शिवसेनेच्या तिकिटावर उभे होते. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

Last Updated : Feb 2, 2022, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.