ETV Bharat / city

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती' सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या निर्णयाचे स्वागत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवस सार्वजनिक सुट्टी

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण देशात साजरी होते. महाराष्ट्र्रासह काही राज्यांत 14 एप्रिलला ससर्वजनिक सुट्टी असते. मात्र, संपूर्ण देशात 14 एप्रिलचा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून अद्याप जाहीर झाला नव्हता.

Dr B R Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
author img

By

Published : Apr 1, 2021, 9:50 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने 14 एप्रिल हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस म्हणून संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. या निर्णयाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण देशात साजरी होते. महाराष्ट्र्रासह काही राज्यांत 14 एप्रिलला ससर्वजनिक सुट्टी असते. मात्र, संपूर्ण देशात 14 एप्रिलचा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून अद्याप जाहीर झाला नव्हता. 14 एप्रिलचा दिवस केंद्र सरकारने सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आपण हार्दिक स्वागत करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि आभार मानत असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athavale
रामदास आठवले

हेही वाचा-निवेदन दिले, गाठीभेटी घेतल्या, पैसेही फेकले तरी दीपालीची बदली नाही-भावनिक पतीचा आरोप

केंद्र सरकारच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, कायदेतज्ज्ञ, देशाचे पहिले कायदा मंत्री, कामगार वर्गाचे कैवारी उद्धारक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल योगदान आहे. 14 एप्रिलला राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करून केंद्र सरकारने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कर्तृत्वासमोर नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस म्हणून संपूर्ण देशात 14 एप्रिलला राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आपण मनःपूर्वक स्वागत करीत असल्याचे आठवले यांनी आज सांगितले.

हेही वाचा-राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने राज्याला फटका -डॉ. संजय ओक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.