मुंबई काल मुंबईत गोरेगाव येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका करत, ( Ram Kadam On Uddhav Thackeray ) तुम्हाला अस्मान दाखवतोच असे आव्हान केलं आहे. यावर आता भाजप नेते राम कदम ( BJP leader Ram Kadam ) यांनी उद्धव ठाकरे हे हतबल झाले असून, विरासतमध्ये भेटलेल सुद्धा त्यांना टिकवता आलं नाही, अशी टीका केली आहे. मुंबईत ते बोलत होते.
खड्ड्याची चिंता करा, अस्मानाची नको ? गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी, तुमच्यात हिम्मत असेल तर मुंबई महापालिकाचं काय, विधानसभेची निवडणूक ही घ्या, तुम्हाला अस्मानाच दाखवतो, असे आव्हान करत भाजपवर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना भाजप नेते आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने अशा पद्धतीचं होतं, अशी टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबईत रस्त्यात पडलेले खड्डे याची चिंता करावी. ३० वर्ष पालिकेत सत्ता असूनही रस्त्यात खड्डे आहेत. त्याचा त्रास येथील जनतेला होत असून त्यांनी खड्ड्याची चिंता करावी. मुंबई पडलेल्या खड्ड्यावरून भ्रष्टाचार, कमिशन याचा संबंध आहे. मुंबईतील शहरवासीयांना याचं कधी उत्तर देणार असे सांगत, अस्मानाची चिंता करू नये असे सांगितले आहे.
ठाकरे यांची शिवसेना आता फक्त पेंग्विन सेना ? शिंदे गट स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, मंत्री, नेते, सर्व शिंदे गटाबरोबर गेले आहेत. व उरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता संपूर्ण देशात पेंग्विन सेना म्हणून ओळखले जात आहे. या कारणाने सुद्धा उद्धव ठाकरे हे हतबल झाले आहेत, असेही राम कदम म्हणाले आहेत. त्याचबरोबर भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्या अगोदर तुम्ही आत्मचिंतन करायला हवं, असा सल्लाही राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. अमित शाह हे ऊर्जावान नेते व मंत्री असून त्यांनी त्यांच्या पक्षाला संपूर्ण विश्वात मोठं करून दाखवलं आहे. परंतु तुम्हाला विरासतमध्ये भेटलेलं सुद्धा साधे टिकून ठेवता आलं नाही, अशी टीकाही राम कदम ( BJP leader Ram Kadam ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.