ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या रणनीतीला सुरुवात; आमदारांसाठी हॉटेल्स बूक

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) अवघ्या चार दिवसांचा शिल्लक राहिला असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने (Shivsena) तिसऱ्या आणि राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरूवात केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली होती.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 6, 2022, 10:30 PM IST

मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) अवघ्या चार दिवसांचा शिल्लक राहिला असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने (Shivsena) तिसऱ्या आणि राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरूवात केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेच्या निवडणुकीत ही रणनीती आखण्यात आली असून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

हेही वाचा - State Cabinate Meeting : आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर....

आमदारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या एकूण संख्याबळावर चार उमेदवार निवडून आले असते. भाजपने सहावा उमेदवार दिल्याने शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची आवश्यकता आहे. या आमदारांना गळाला लावण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या. नाराज आमदारांची मनधरणी करून सहावा उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. परंतु, आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी छोटे पक्ष आणि आमदारांनी पाठिंबा दिला होता. हे आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार, शिवसेना समर्थक लहान पक्ष आणि अपक्ष आमदार बैठक बोलावली होती. तर, मेळघाटचे अपक्ष आमदार वर्षावर दाखल झाले आहे. वर्षावर सेनेचे जवळपास 35 ते 40 आणि 1 अपक्ष उपस्थित होते. या बैठकीनंतर उपस्थित सर्व आमदारांना मालाड येथील हॉटेल रिट्रीट येथे ठेवण्यात येणार आहे.

नाराज आमदार आशिष जयस्वाल वर्षावर - मविआ मंत्र्यांवर जयस्वाल यांनी टक्केवारी आणि घोडेबाजार यावर टिप्पणी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आमदार आशिष जयस्वाल बैठकीला येणार की नाही, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र जयस्वाल बैठकीला हजर झाले. त्यांच्याकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सेना वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. कोणत्या कामांबाबत ते नाराज असल्याची माहितीही मागितली.

आमदारांसाठी बसेस तयार - आता या आमदारांसाठी 2 लक्झरी बसेल मागवण्यात आल्या. या आमदारांना मालाडला नेण्यात येणार आहे. 98 प्रवासी क्षमता या 2 बसेसची आहे. श्री गाला ट्रॅव्हल्सच्या या बसेस आहेत. या आमदारांना मालाडच्या मारवे मढावर हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, मराठवाड्यातील आमदार उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर येणार आहे. जवळपास 80 टक्के आमदार आज दाखल झाले आहे. 2019 च्या सत्ता स्थापन कालावधीत, याच रिट्रीट हॉटेलमध्ये सेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले होते. त्याच स्वरूपाची रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे.

हेही वाचा - Supriya Sule : 'महाविकास आघाडीने मनाचा मोठेपणा दाखवला, पण भाजपाने...'; राज्यसभा निवडणुकीवरुन सुप्रिया सुळेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.