ETV Bharat / city

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट, उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण - बाळासाहेब ठाकरे जुना व्हिडीओ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर व्हिडीओ ( Raj Thackeray Twitter Video ) शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ( CM Uddhav Thackeray ) बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करून दिली ( Balasaheb Thackeray Old Video ) आहे. ज्या दिवशी माझं सरकार येईल त्यादिवशी लाऊडस्पिकरवरून नमाज बंद, असं बाळासाहेब ठाकरे व्हिडिओत सांगताना दिसत ( Balasaheb Thackeray On Mosque Loudspeakers ) आहेत.

Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरे
author img

By

Published : May 4, 2022, 10:22 AM IST

Updated : May 4, 2022, 10:32 AM IST

मुंबई : मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मशिदींसमोरच हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांकडून ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर व्हिडीओ ट्विट करत ( Raj Thackeray Twitter Video ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ( CM Uddhav Thackeray ) बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची आठवण करून दिली ( Balasaheb Thackeray Old Video ) आहे.

राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट, उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

काय आहे व्हिडिओत : हा व्हिडीओ शिवसेनेच्या जुन्या सभेतील दिसत आहे. ज्यामध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे भाषण करत आहेत. त्यात ते म्हणतात की, माझं सरकार आल्यावर रस्त्यावरची नमाज बंद होईल. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुणाला त्रास होत असेल तर त्यांनी मला सांगावं. मी त्याचा बंदोबस्त करेल. लाऊडस्पिकर मशिदीवरचे खाली येतील. बंद... ( Balasaheb Thackeray On Mosque Loudspeakers )

पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा : दरम्यान, मनसेच्या हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Agitation MNS ) आंदोलनावरून आता मुंबईत तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी मुंबईतील विविध पोलीस ठाण्याना भेटी देत स्वतः कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा ( CP Reviews Mumbai Law Order Situation ) घेतला.

हेही वाचा : Loudspeaker Row LIVE Updates : चारकोपमध्ये इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा

Last Updated : May 4, 2022, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.