मुंबई - काही वर्षापूर्वी महानगरपालिकेत असलेल्या आपल्या पक्षाचा दबदबा पुन्हा एकदा दिसावा यासाठी राज ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पक्षाची ताकद दाखवण्यासाठी राज ठाकरे तयारीला लागले आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक वांद्रे येथील एम आय जी क्लब येथे होणार आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुका लढवण्यासाठी पक्षाची तयारी कुठपर्यत आहे. तसेच संघटन आणि बांधणी यावर बैठकीत देखील चर्चा होणार आहे. पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे.
सत्तेत नसला तरी चर्चेत असणारा पक्ष-
महाराष्ट्र निर्माण सेना सत्तेत नसला तरी पक्षाचा दबदबा अजूनही कायम आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा पक्ष नेहमी चर्चेत असतो. पुन्हा एकदा पक्षाला चांगले दिवस यावे, यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज येथे गेल्या काही दिवसात अनेक बैठका कार्यकर्त्यांसोबत झाल्या आहेत. ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण जोराने उतरणार आहे. यासाठी विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेतल्या जात आहे. पक्षाची दिशा काय असावी यासाठी देखील राज हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहे. विविध जिल्ह्याच्या महानगरपालिका निवडणुका काही दिवसातच लागणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कम बॅक करेल का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नाशिकमध्ये पुन्हा चालणार का मनसेची जादू-
मुंबई आणि नाशिक जिल्हा हा महाराष्ट्र निर्माण सेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र नाशिकमध्ये अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्यासाठी आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मनसेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी 7 डिसेंबरला ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा- ठरलं..! 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशकात होणार