ETV Bharat / city

त्यासाठी तुम्ही शरद पवारांना भेटा; राज यांना कोश्यांरीचा 'मनसे' सल्ला

author img

By

Published : Oct 29, 2020, 10:19 AM IST

Updated : Oct 29, 2020, 12:13 PM IST

या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रश्न तत्काळ सुटला पाहिजे, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक समस्या सुरू आहेत. त्यात हा वीज बिल वाढीचा फटका सहन करावा लागत आहे. म्हणून आज राज्यपालांना भेटून निवेदन दिले असल्याचे सांगितले. तसेच राज्यपालांच्या या भेटीत कोश्यारी यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.

Raj Thackeray mns
राज यांना कोश्यांरीचा 'मनसे' सल्ला

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. वाढीव वीज बिले कमी करण्या संदर्भात सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, यासंदर्भात ठाकरे यांनी कोश्यारी यांना निवेदन दिले आहे. यावर कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना वीजबिल प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला आहे. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून वीज बिल प्रश्नी होणाऱ्या दिरंगाईवर सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.

राज यांना कोश्यांरीचा 'मनसे' सल्ला

वीज वितरण कंपन्याकडून टोलवा टोलवी -

या भेटीनंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्यातील वाढीव वीज बिलाचा प्रश्न काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्या संदर्भात आमचे पदाधिकारी सरकार आणि वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते. मात्र, त्यावर काही तोडगा निघाला नाही. वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांनी वीज बिल कमी करण्याचा मुद्दा हा एनईआरसीच्या मान्यतेनंतरच सोडवला जावू शकतो, असा दावा केला. त्यावर आमचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात एक शिष्ठमंडळ एनईआरीसीच्या अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, त्यांनी हा प्रश्न वीज वितरण कंपन्या स्वत: सोडवू शकतात असे स्पष्ट केले. त्यामुळे वीज वितरण कंपन्याकडून टोलवा टोलवी केली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

या वीज बिल प्रश्नी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीन राऊत यांनी लवकरात लवकरात निर्णय घेऊ याशिवाय दुसरे काही आश्वासन दिले नाही. सरकारकडून जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे घेणार राज्यपालांची भेट

राज्यपालांनी सांगितले पवार साहेबांशी बोलून घ्या...

या सर्व पार्श्वभूमीवर हा प्रश्न तत्काळ सुटला पाहिजे, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक समस्या सुरू आहेत. त्यात हा वीज बिल वाढीचा फटका सहन करावा लागत आहे. म्हणून आज राज्यपालांना भेटून निवेदन दिले असल्याचे सांगितले. तसेच राज्यपालांच्या या भेटीत कोश्यारी यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यसराकार अडले कशावरती यावरती राज्य सरकारने लवकर निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, आणि लोकांना दिलासा द्यावा. तसेच या प्रश्नी लवकरच पवार साहेंबाशी फोनवर बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून विनंती करणार असल्याचेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्यपालांना निवेदन दिले आहे.. मात्र

वीज बिलासंदर्भात आज राज्यपालांना निवेदन दिले आहे. मात्र, सरकार आणि राज्यपालांचे फारच सख्य असल्याने हा निर्णय़ किती लवकर होईल, याबाबत प्रश्न चिन्हच आहे? असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारच्या कुरघोडीच्या मुद्यावर चिमटा काढला.

सरकार कुंथत चालत आहे. रेल्वे अजून सुरू झाली नाही. बार सुरू आहेत मंदिरे बंद आहेत. महिलांना लोकल प्रवास पुरुषांना नाही. असे अनेक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न सरकारला माहीत आहेत. मात्र त्याबाबत हे सरकार कोणताही निर्णय का घेत नाही, एका छोट्याश्या निर्णयासाठी इतका का वेळ लावता असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच सरकारने निर्णय घ्यायला हवेत, प्रश्नांची कमतरता नाही. सरकारच्या निर्णयांची कमतरता असल्याची टीकाही केली.

Last Updated : Oct 29, 2020, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.