मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे बंधनकारक आहे. मात्र काही नेते मास्क घालत नाहीत. असे सांगताना राज ठाकरे यांनी मास्क घालावा, अशी विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
राज ठाकरे विनामास्क -
सद्या विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाते आहे. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतात. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राज ठाकरे विनामास्क दिसल्यानंतर पत्रकारांनी तुम्ही मास्क नाही घातला, असा प्रश्न केला. त्यावर मी मास्क घालतच नाही, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. काही कार्यक्रमात ते विनामास्क सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महापौरांची विनंती -
या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांनी मास्क घालावा, अशी चक्क विनंती केली आहे. माझी राज ठाकरेंना हात जोडून विनंती आहे की मास्क घाला. आपल्या घरी आपल्या आई आमच्या कुंदा वहिनी वयस्कर आहेत. तुम्हाला अनेकजण फॉलो करतात. अनेकांचे तुम्ही आयडॉल आहात. मला राज ठाकरेंवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. प्रशासन कारवाई करेल, असेही महापौर म्हणाल्या.
हेही वाचा- चिंताजनक! राज्यात गुरुवारी 14 हजार 317 कोरोनाबाधितांची वाढ