ETV Bharat / city

आता मुक्काम पोस्ट 'शिवतीर्थ'... राज ठाकरे यांचा नवीन घरात प्रवेश - शिवतीर्थ बातमी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिपावलीच्या मुहूर्तावर भाऊबीजेच्या दिवशी आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील त्यांच्या जुन्या कृष्णकुंज या निवासस्थानाच्या शेजारीच ही नवीन पाच मजली इमारत बांधण्यात आली. या नवीन घराचं नाव 'शिवतीर्थ' ठेवण्यात आले आहे.

Shivtirth
राज ठाकरे यांचे नवीन घर शिवतीर्थ
author img

By

Published : Nov 6, 2021, 5:21 PM IST

Updated : Nov 6, 2021, 7:48 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिपावलीच्या मुहूर्तावर भाऊबीजेच्या दिवशी आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील त्यांच्या जुन्या कृष्णकुंज या निवासस्थानाच्या शेजारीच ही नवीन पाच मजली इमारत बांधण्यात आली. या नवीन घराचं नाव 'शिवतीर्थ' ठेवण्यात आले आहे. या इमारतीत मनसे मुख्यालय, समिती कक्ष, ग्रंथालय त्याचबरोबर ठाकरे परिवारासाठी स्वतंत्र मजले बांधण्यात आले आहेत.

राज ठाकरे यांचा नवीन घरात प्रवेश

हेही वाचा - राज ठाकरे डिसेंबरला अयोध्येला येणार, हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावणार - गुरु माँ कांचन गिरी

  • कृष्णकुंज ते शिवतीर्थ -

या नवीन इमारतीचे काम सुरू झाल्यापासूनच राज ठाकरे याला काय नाव देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांच्या जुन्या इमारतीचे नाव 'कृष्णकुंज' होते, तर आता नवीन इमारतीला नाव 'शिवतीर्थ' देण्यात आले आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी या नामफलकाचे उद्घाटन केले. ही नवी इमारत सर्व सुविधांनीयुक्त परिपूर्ण अशी बांधण्यात आली आहे.

या इमारतीमध्ये भव्य ग्रंथालय असून, पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय असणार आहे. त्यामुळे याच ठिकाणी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना तसेच इतर नागरिकांना भेटतील.

  • शिवाजी पार्क हेच शिवतीर्थ -

शिवाजी पार्क अर्थातच शिवतीर्थ. याच शिवतीर्थावर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आलेला आहे, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भाषणेसुद्धा याच मैदानावर गाजलेली आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी येथे होते. आता शिवतीर्थ या नावानेच प्रसिद्ध असलेल्या शिवाजी पार्क या मैदाना शेजारी उभारलेले राज ठाकरे यांचे 'शिवतीर्थ' हे निवासस्थान आता मनसैनिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.

हेही वाचा - राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे - बाळा नांदगावकर

Last Updated : Nov 6, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.