मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला राज्य सरकारमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भातली मागणी केली आहे. या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्रक मनसेने जारी केलं आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण व्हावे ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे. काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचारी संबंधित पत्र लिहिलं होतं. आज पुन्हा राज यांनी नवीन पत्र जारी करत कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. या पत्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करण्यात येते की, राज ठाकरेंच्या आदेशानुसार आपणा सर्वांना एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे, असे आदेश मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनाही लिहिलं होतं पत्र -
ऐन दिवाळीत राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. तरीदेखील काही कामगार संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत यापैकी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये समावेश करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या कामगारांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा दिला होता.
हेही वाचा - बांसुरी स्वराज यांनी स्वीकारला आईचा पद्मविभूषण सन्मान; पी व्ही सिंधू, कंगना रणौतचाही "पद्म"ने गौरव!