मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्राने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज कुंद्राच्या वकिलांनी युक्तीवाद केला.
याचिकाकर्त्याचा उच्च न्यायालयात सवाल -
पंचनामा स्पष्ट सांगतो की, चौकशी सुरू व्हायच्या आधीच पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप इत्यादी गोष्टी जप्त केल्या होत्या. मग चौकशीदरम्यान आरोपी डेटा डिलीट करत होते, हा आरोप कसा करता येईल? असा सवाल याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात केला आहे.
जुलैमधील चौकशीत कुठेही उल्लेख नाही -
हा आरोप फेब्रुवारीच्या चौकशीत करण्यात आला होता, जुलैच्या चौकशीत नाही. फेब्रुवारी 2021 मधील पोलीस तपासात त्याची नोंद आहे. मात्र जुलैमधील चौकशीत अथवा कागदोपत्री याचा कुठेही उल्लेख नाही, असा दावा राज कुंद्राच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला.
हेही वाचा - Raj Kundra Pornography Case : मी अद्याप कोणतीही टिप्पणी केलेली नाही - शिल्पा शेट्टी
राज्य सरकारचा जोरदार विरोध -
पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत राज कुंद्राने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याला राज्य सरकारने जोरदार विरोध केला आहे.
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर, राज कुंद्राच्या वतीने हायकोर्टात याचिका