ETV Bharat / city

Raj Bhavan Closed : राजभवन एक आठवडाभर बंद; कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय - राजभवन एक आठवडाभर बंद

राज्यात कोरोना संसर्ग वाढीचा फटका राजभवानला बसला असून एक आठवड्यासाठी राजभवन बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (Raj Bhavan Closed) सोमवारपासून राजभवन सर्वच राजकीय व अन्य कारणांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

राजभवन
राजभवन
author img

By

Published : Jan 18, 2022, 9:19 AM IST

मुंबई - राज्यात कोरोना संसर्ग वाढीचा फटका राजभवानला बसला असून एक आठवड्यासाठी राजभवन बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (Raj Bhavan closed for a week) सोमवारपासून राजभवन सर्वच राजकीय व अन्य कारणांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

राजभवन एक आठवडाभर बंदबाबतची नोटीस
राजभवन एक आठवडाभर बंदबाबतची नोटीस

कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग वाढला

मागच्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. याचा फटका आता थेट राज्याचे राजकीय केंद्रस्थान असणाऱ्या राजभवनला बसला आहे. राजभवन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सोमवापासून पुढचे आठ दिवस राजभवन राजकीय व इतर नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राजभवन प्रशासनाने घेतला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिंता वाढल्या

राज्यात निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत राजभवन बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. ऐन निवडणुकीची तयारी सुरू झाली असल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे राजभवन परिसरात येणे जाणे वाढले होते. त्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात झाला होता. याची खबरदारी घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मागच्या महिनाभरात राजभवन बनले होते चर्चेचा विषय

राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याअगोदर सरकारविरोधात अनेक तक्रारी करण्यासाठी विरोधक थेट राजभवनची वाट धरत होते. त्यातच नुकताच काँग्रेस पक्षाने राजभवनवर भाजप सरकारविरोधात मोर्चा देखील काढला होता. यावेळी कोविड नियमांचा पार बोजवारा उडाला होता. त्यामुळे आता राज्यात कारोना संकट गंभीर होत असताना प्रशासनाने अधिक होणारा संसर्ग टाळण्यासाठी सादर राजभवन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - Brother and Sister Death : भावाला वाचवताना बहिणीचाही शेततळ्यात बुडून मृत्यू, पाटण तालुक्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.