ETV Bharat / city

Mumbai Rain Update : मुंबईत पुन्हा पावसाची हजेरी - ढगाळ वातावरण

मुंबईत 11 जूननंतर पाठ फिरवलेल्या पावसाने पाच दिवसांनी म्हणजेच गुरुवारी (दि. 16 जून) पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडत आहे. आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या सरी किंवा मध्यम पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 16, 2022, 11:50 AM IST

मुंबई - मुंबईत 11 जूननंतर पाठ फिरवलेल्या पावसाने पाच दिवसांनी म्हणजेच गुरुवारी (दि. 16 जून) पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडत आहे. आज ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या सरी किंवा मध्यम पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पावसाची हजेरी - मुंबईत जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नव्हता. 9 जून, 10 जूनला सायंकाळी पाऊस पडला. 11 जूनला पाऊस मुंबईत दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर मात्र मुंबईतून पावसाने पाठ फिरवली होती. आज 16 जूनला पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.

समुद्राला मोठी भरती - दरम्यान, आज दुपारी 1.35 वाजता समुद्राला मोठी भरती असून यावेळी 4.87 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. तसेच उद्या 17 जून रोजी दुपारी 1.24 वाजता 4.15 मीटरच्या लाटा उसळू शकतात. समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याने नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात किंवा समुद्र किनारी जाऊ नका, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण; राज्य सरकारकडून तब्बल 13 वर्षांनी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.