मुंबई - दिवसेंदिवस रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांमध्ये सर्रास घडणाऱ्या पाकीटमारीत आता मोबाईल चोरीचीही भर पडली ( Stolen Mobile ) आहे. मागील चार वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील परिसरात ६५ हजारांहून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. चोरीला गेल्या मोबाईलपैकी फक्त ९ हजार मोबाईलचा तपास लागलेला आहे. तर ५६ हजार मोबाईलचा पत्ता लागलेला नाही.
६५ हजार ४२१ मोबाईल चोरी - लोकल ट्रेनचा गर्दीचा फायदा घेऊन दररोज ५० पेक्षा जास्त मोबाईल चोरीचा घटना घडत असतात. गेल्या काही वर्षांपासून मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यांचा तपास लावताना मुंबई लोहमार्ग पोलिसही निरनिराळ्या युक्त्या लढवत आहेत. मात्र, मोबाईल चोरट्याच्या लोहमार्ग पोलिसांना मुसक्या आवरता आल्या नाही, असे दिसून येत आहे. कारण २०१८ ते २०२१ या चार वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ६५ हजार ४२१ मोबाईल चोरी गेले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक मोबाईल हे २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांत गेले आहे. २०२० मध्ये कोरोनामुळे रेल्वे ठप्प असल्याने फक्त २०२० मध्ये ५ हजार ८५ आणि २०२१ मध्ये ४ हजार ६८ मोबाईल चोरी गेल्याची नोंद आहेत. गेल्या चार वर्षांत लोहमार्ग पोलिसांनी चोरी गेल्या ६५ हजार मोबाईलपैकी फक्त ८ हजार ९२१ मोबाईलचा शोध लावलेला आहे.
चोरीस गेलेले मोबाईल या राज्यात सापडले - रेल्वेने चोरी गेल्या मोबाईला शोध लावण्यासाठी एक पथक नेमले आहे. त्यानुसार, चोरी गेलेल्या मोबाईला ट्रेस केले जात आहे. रेल्वे पोलिसांच्या पथकाने २०१८-२०२१ दरम्यान चोरीला गेलेले ८ हजार ९२१ मोबाईल शोधून काढले आहेत. तर ४ हजार १०३ मोबाईला पोलिसांनी ट्रेस केले आहेत. मुंबईत चोरीला गेलेले मोबाईल हे उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये चोरट्यांकडून विकले जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. उत्तरप्रदेश एक हजार १०२, बिहार ४४२, पश्चिम बंगाल ४४१, महाराष्ट्र ४२४, मुंबईत ३९८, कर्नाटक २४२, गुजरात २०५, आंध्र प्रदेश १८९, तामिळनाडू १७८, मध्य प्रदेश १५०, राजस्थान १०८,ओडिशा ४०, दिल्ली ४८, हरियाणा २८, पंजाब २७, केरळ २१, जम्मू आणि काश्मीर १९, आसाम १९ आणि उर्वरित राज्यांमध्ये १२, असे चार हजार १०३ चोरी गेलेले मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी ट्रेस केले आहेत.
मोबाईल चोरी गर्दीच्या वेळी - मोबाईल आणि पाकीट चोरीचे गुन्हे हे सर्व साधारणपणे सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे ऐन गर्दीच्या वेळीच घडतात. त्यामुळे आम्ही या वेळेत जास्तीत जास्त सतर्क राहतो. मुंबईत दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक स्थंकावर बारीक लक्ष ठेवून असतो. प्रवाशांनीही आपल्या मोबाईलसह आपल्या साहित्यावर विशेष लक्ष ठेवावे. प्रवाशांनीही शक्यतो दरवाजात उभे राहून मोबाइलवर बोलणे टाळावे, असे आवाहन लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारता'चा माध्यमातून केले आहेत.
काय काळजी घ्याल..?
- रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधगिरी बाळगा.
- लोकलच्या डब्यात दारात उभे राहून बोलणे टाळावे.
- लोकलमध्ये चढताना-उतरताना कधीच मोबाइलवर बोलत उतरू अथवा चढू नये.
- लोकलच्या दारात व्हाटसअप चार्ट करू नका.
- लोकल प्रवास करताना आपल्या सामानाची काळजी घ्या.
- प्रवास करताना चारही बाजू लक्ष असू द्या.
- लोकलमध्ये हेडफोन टाकून झोपू नका.
- दुसऱ्याला मोबाईल देऊ नका.
चोरीला गेलेल्या व सापडलेल्या मोबाईलची आकडेवारी -
साल | चोरीला गेलेले मोबाईल | सापडलेले मोबाईल |
२०१८ | ३२ हजार ३२९ | ३ हजार २६३ |
२०१९ | २३ हजार ९३९ | ३ हजार ३२५ |
२०२० | ५ हजार ८५ | १ हजार ६० |
२०२१ | ४ हजार ६८ | १ हजार २६३ |
हेही वाचा - जोडीदार मज निर्व्यसनीच हवा!