मुंबई- स्वतःचा जीव धोक्यात घालून मध्य रेल्वेचे सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी नदीच्या पुलावर अडकून पडलेल्या गोदान एक्स्प्रेस ट्रेनची अलार्म चेन पुलिंग ( Railway Chain Pull ) रिसेट केल्याने रेल्वेची विस्कळीत झाली नाही. सतीश कुमार यांच्या धाडसी कार्यची दखल घेत रेल्वे मंत्र्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सतीश कुमार यांच्या अलार्म चेन पुलिंग रिसेट ( Railway Chain Pull Alarm Reset ) करण्याचा व्हिडीओ शेअर करत प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीतच ट्रेनची साखळी ओढण्याचे आव्हान केले ( Railway Minister praises Satish Kumar ) आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून चेन पुलिंग केली रिसेट- गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गवरील रेल्वे प्रवास काही प्रवाशांकडून विनाकारण अलार्म चेन पुलिंग करण्याचा घटना वाढल्या आहेत. काही आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात अलार्म चेन असते, जे ओढल्यावर प्रवाशाही हवे तेव्हा ट्रेन थांबवू शकतात. मात्र, अनेकदा प्रवाशांकडून छोट्याश्या कारणासाठीही ही चेन पुलिंग करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे रेल्वेला मोठा फटका बसतो आहे. अशीच एक घटना काल घडली आहे. ट्रेन क्रमांक 11059 गोदान एक्स्प्रेसमधील अज्ञान प्रवाशांने अचानक अलार्म चेन पुलिंग केल्याने टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर गोदान एक्स्प्रेस थांबली होती. त्यामुळे मागून येणाऱ्या रेल्वे गाड्या काही वेळासाठी खोळंबणार होत्या. मात्र, सहाय्यक लोको पायलट, सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीच्या पुलावर थांबलेल्या गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन रीसेट केली. त्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली.
अवघ्या १५ दिवसांत १९७ चेन पुलिंगचा घटना - १६ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२२ पर्यत मध्य रेल्वेचा मुंबई विभागात एकूण १९७ चेन पुलिंगचा घटना घडल्या आहे. यामध्ये सर्वाधिक चेन पुलिंगच्या घटना उत्तर प्रदेशात जाणाऱ्या रेल्वे गाड्यात घडल्या. अलार्म चेन पुलींगच्या गैरवापराची १६६ प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामध्ये ११३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५६ हजार ५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलींगचा वापर करू नये असे आम्ही प्रवाशांना आवाहन करतो आहे. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित गाड्या सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचावे आणि मर्यादित सामान घेऊन जावे.
-
Dedication!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rectifying ‘Chain Pull’ brake on the bridge. pic.twitter.com/L6VgOfjCeq
">Dedication!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 7, 2022
Rectifying ‘Chain Pull’ brake on the bridge. pic.twitter.com/L6VgOfjCeqDedication!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) May 7, 2022
Rectifying ‘Chain Pull’ brake on the bridge. pic.twitter.com/L6VgOfjCeq