ETV Bharat / city

पॉड हॉटेलपेक्षा रेल्वेची डोरमेटरी रूम बरी! दर कमी करण्याची होतेय मागणी - रेल्वे पॉड हॉटेल

आयआरसीटीसी(IRCTC)च्यावतीने मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी या स्थानकांवर अत्याधुनिक विश्रामगृह उभारण्यासाठी योजना आखण्यात आली होती. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथे अत्याधुनिक रेल्वेचे विश्रामगृह (Reest House of the train) सुरू झाले नाही. उलट याऐवजी जपानच्या धर्तीवर पॉड हॉटेल सुरू झाले आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना परवडणार असे पॉड हॉटेलचे दर नाहीत. यामुळे रेल्वेने हे दर कमी करावेत अशी मागणी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा (Railway Pravasi Group President Harsha Shah) यांनी केली आहे.

रेल्वे पॉड हॉटेल
रेल्वे पॉड हॉटेल
author img

By

Published : Nov 18, 2021, 7:27 PM IST

मुंबई - लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही तासांसाठी विश्रांती घेण्यासाठी अत्याधुनिक विश्रामगृह (एक्झिक्युटिव्ह लाउंज) पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानकांवर उभारण्यात येणार होते. मात्र, ही योजना सध्या कागदावर असल्याची माहिती मिळत आहे. या उलट मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात परदेशाप्रमाणे पॉड हॉटेलची सुरुवात केली आहे. रेल्वेची ही कल्पना जरी चांगली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांना हे पॉड हॉटेल (indian railways pod hotel) परवडणारे नाहीत.

पॉड हॉटेलचे दर कमी करा - हर्षा शहा

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉपोर्रेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद याठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृह आहेत. आयआरसीटीसी(IRCTC)च्यावतीने मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी या स्थानकांवर अत्याधुनिक विश्रामगृह उभारण्यासाठी योजना आखण्यात आली होती. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया २०१९मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(CSMT)वर ही सुविधा सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत मुंबई सेंट्रल (Mumbai Central) येथे अत्याधुनिक रेल्वेचे विश्रामगृह (Reest House of the train) सुरू झाले नाही. उलट याऐवजी जपानच्या धर्तीवर पॉड हॉटेल सुरू झाले आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना परवडणार असे पॉड हॉटेलचे दर नाहीत. यामुळे रेल्वेने हे दर कमी करावेत अशी मागणी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा (Railway Pravasi Group President Harsha Shah) यांनी केली आहे.

काय होती योजना?

रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात अत्याधुनिक, आरामदायी, अलिशान अशा विश्रामगृहाची उभारणी करण्यात येणार होती. या विश्रामगृहात प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ, टीव्ही, वर्तमानपत्र, मासिक, रेल्वेचे अपडेट, अंघोळ, शौच यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना किमान २ तासांची विश्रांती करता येणार आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाइनच्या विश्रांतीगृहात प्रवाशांना येथे तात्पुरती राहण्याची उत्तम सोय करण्यात आली. सध्या हे अत्याधुनिक विश्रामगृह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू करण्यात आले आहे. त्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, इतर स्थानकांवर ही सुविधा सुरू झालेली नाही.

पॉड हॉटेलपेक्षा रेल्वेची डोरमेटरी रूम बरी!

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी ईटीव्ही भारताला सांगितले, की मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांत परदेशाप्रमाणे पॉड हॉटेलची सुरुवात केली आहे. रेल्वेची ही कल्पना जरी चांगली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांना हे पॉड हॉटेल परवडणारे नाही. अमेरिका, जपान आणि चीनमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून रेल्वे स्थानकांवर अशा पद्धतीचे हॉटेल सुरू आहे. तिथे बुलेट ट्रेनसारख्या अत्याधुनिक रेल्वे गाड्या धावतात. तेथील नागरिक आर्थिक सक्षम आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना या सुविधा परवडतात. मात्र, आपल्याकडे परिस्थिती उलट आहे. रेल्वेच्या वातानुकूलित डोरमेटरी रूम(railway dormitory room)चा दर फक्त २५० रुपये आहे. त्यामुळे रेल्वेनेसुद्धा पॉड हॉटेल दर कमी करावेत. याशिवाय १२ तासाच्या कालावधीनुसार दर न आकारात फक्त तासाप्रमाणे दर आकारावेत, अशी मागणी हर्षा शहा यांनी केली आहे.

पॉड हॉटेलचे दर

या पॉड हॉटेलचे दर 12 तासांसाठी 999 रुपये प्रति व्यक्ती ते 24 तासांसाठी 1999 रुपये प्रति व्यक्ती असे आहेत. तर प्रायव्हेट पॉडसाठी 12 तासांना 1249 रुपये तर 24 तासांना 2499 रुपये मोजवे लागतील. महत्त्वाचे म्हणजे या हॉटेलमध्ये चप्पल, शूज घालून जाता येणार नाही. तसेच जेवणदेखील बाहेरून खाऊन यावे लागणार आहे.

रेल्वेच्या डोरमेटरी रूमचे दर परवडण्याजोगे

रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी प्रमुख रेल्वे स्थानकांत डोरमेटरी रूम असते. अत्यंत मुबलक दरात प्रवाशांना विश्रांतीसाठी डोरमेटरी रूम उपलब्ध करून दिली जाते. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या डोरमेटरी रूमचे दर कमी आहेत. 12 तासांसाठी एक रूम-दोन बेडचे दर 800 रुपये, तर 12 तासासाठी वातानुकूलित दोन बेड 1 हजार रुपये, जनरल वातानुकूलित डोरमेटरीसाठी 250 रुपये आणि महिलांसाठी वातानुकूलित डोरमेटरी 250 रुपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.