मुंबई - मुंबईतील वरळी येथील एका आलिशान स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. अरुजा स्पा असे या मसाज पार्लरचे नाव असून ते स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होते. दरम्यान स्पामधून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पाचे मालक आणि मॅनेजरवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींवर वरळी पोलीस ठाण्यात मानवी तस्करी आणि सेक्स रॅकेट चालवण्याचे गुन्हे दाखल आहे.
हेही वाचा - Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अटकेची शक्यता.. शरद पवारांवरील 'पोस्ट'वरून गुन्हा दाखल
डमी ग्राहक पाठवून मिळवली खात्री - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरळी सी फेसवरील खान अब्दुल गफ्फार खान रोडवरील अरुजा स्पा येथे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पोलिसांकडून एक डमी ग्राहक स्पा ठिकाणी पाठवण्यात आला. माहिती खरी असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि स्पाचा पर्दाफाश केला. या स्पाच्या मालक आणि मॅनेजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पाच्या माध्यमातून ग्राहकांना महिलेच्या सेवेसाठी 2000 रुपये आणि मसाजसाठी 1000 रुपयांची मागणी करण्यात येते होती. या सर्व रॅकेट मधील तीन महिलांना मुंबई पोलिसांनी मुक्त केले आहे.