ETV Bharat / city

मुंबईमध्ये बाहेरील लसीकरण केंद्रांना नो एन्ट्री, राजकीय बॅनरबाजीला चाप - मुंबई लेटेस्ट न्यूज

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरण मोहीम वेगात सुरू राहावी म्हणून प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये, खासगी सोसायट्या आणि कंपन्यांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणी राजकीय बॅनरबाजी बंद करावी. तसेच मुंबईच्या हद्दीत बाहेरील केंद्र येऊन लसीकरण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा मुंबई बाहेरील केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

मुंबईमध्ये बाहेरील लसीकरण केंद्रांना नो एन्ट्री

author img

By

Published : Jun 14, 2021, 10:48 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरण मोहीम वेगात सुरू राहावी म्हणून प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये, खासगी सोसायट्या आणि कंपन्यांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणी राजकीय बॅनरबाजी बंद करावी. तसेच मुंबईच्या हद्दीत बाहेरील केंद्र येऊन लसीकरण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा मुंबई बाहेरील केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

राजकीय बॅनर लावल्यास कारवाई - महापालिका आयुक्त

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम व्यापक व्हावी म्हणून मुंबईमधील २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी प्रसिद्धीसाठी संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या पक्षाकडून बॅनरबाजी केली जाते. त्याचप्रमाणे सोसायट्या आणि लसीकरण केंद्र असलेल्या ठिकाणीही बॅनरबाजी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून लसीकरण केंद्रांवर राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी बॅनर लावू नयेत अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, अखेर पालिका आयुक्तांनी आज परिपत्रक काढून बॅनरबाजी केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

...तर लसीकरण केंद्राची मान्यता रद्द होणार

ज्या खासगी रुग्णालयांना पालिकेने मंजुरी दिली आहे, त्यांनाच लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी आहे. तसेच लसीकरण केंद्राबाहेर रुग्णवाहिका तैनात ठेवणे, खासगी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करताना संबंधित कार्पोरेट कंपन्यांशी सामंजस्य करार करणे बंधनकारक आहे. तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. या सर्व नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित केंद्राला कारणे दाखवा नोटीस पाठवून मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशाराही महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

विद्रुपीकरणाला आळा

दरम्यान, यापूर्वी पालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी बॅनर्स होडिंग व पोस्टर्स झळकवण्यास मनाई केली असून, आता खासगी सोसायटी, निवासी इमारती या ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण केंद्राजवळ देखील बॅनर्स, होडिंग व पोस्टर्स झळकवण्यास बंदी घालण्यात आली आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे लसीकरण केंद्रांच्या विद्रुपीकरणाला आळा बसणार आहे.

हेही वाचा -खासदार संभाजी व खासदार उदयनराजे भोसले यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करा - अ‌ॅड. सदावर्ते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.