मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गाचे उद्घाटन ( pm modi thane railway line ) करण्यात आले. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही त्यांनी हिरवी झेंडी दाखविली आहे.
ठाणे ते दिवा दरम्यान 5 आणि 6 व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ स्क्रिनिंग ( PM Modi Thane Railway line ) मार्फत झाले आहे. या कार्यक्रकमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह विविध नेते मंडळींना उपस्थित राहिल्याची ( pm modi diva railway line ) माहिती आहे.
-
Prime Minister Narendra Modi inaugurates newly commissioned rail line between Thane and Diva in Maharashtra pic.twitter.com/OlTQ9sPl1x
— ANI (@ANI) February 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Prime Minister Narendra Modi inaugurates newly commissioned rail line between Thane and Diva in Maharashtra pic.twitter.com/OlTQ9sPl1x
— ANI (@ANI) February 18, 2022Prime Minister Narendra Modi inaugurates newly commissioned rail line between Thane and Diva in Maharashtra pic.twitter.com/OlTQ9sPl1x
— ANI (@ANI) February 18, 2022
-
Making Railways modern, safe & convenient is among the top priority of our Govt. Even COVID couldn't deviate us from our commitment to this cause. The Railways has made new records in freight transportation in last 2 years: PM Modi while inaugurating 2 rail lines b/w Thane & Diva pic.twitter.com/ftWgJLFRNS
— ANI (@ANI) February 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Making Railways modern, safe & convenient is among the top priority of our Govt. Even COVID couldn't deviate us from our commitment to this cause. The Railways has made new records in freight transportation in last 2 years: PM Modi while inaugurating 2 rail lines b/w Thane & Diva pic.twitter.com/ftWgJLFRNS
— ANI (@ANI) February 18, 2022Making Railways modern, safe & convenient is among the top priority of our Govt. Even COVID couldn't deviate us from our commitment to this cause. The Railways has made new records in freight transportation in last 2 years: PM Modi while inaugurating 2 rail lines b/w Thane & Diva pic.twitter.com/ftWgJLFRNS
— ANI (@ANI) February 18, 2022
- प्रकल्पामुळे फायदे:
कुर्ला ते कल्याण या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग वेगळे होतील. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ल्याजवळ) येथून निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय वाहतुकीला अडथळा न आणता पाचव्या आणि सहाव्या मार्गावर कल्याणपर्यंत जाऊ शकतात. यामुळे रेल्वेचे कामकाज चांगले होईल.
३६ अतिरिक्त उपनगरीय सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान आणि पुढे (३४ वातानुकूलित आणि २ विना-वातानुकूलित) सुरू केल्या जातील.
कळवा, मुंब्रा या कॉरिडॉरच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल कारण मेगाब्लॉक दरम्यान उपनगरीय गाड्या एकाच कॉरिडॉरमध्ये प्रवाशांना सेवा पुरवतील.
- ऐतिहासिक महत्व-
कुर्ला/लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण दरम्यानचा ५वा आणि ६वा रेल्वेमार्ग ठाण्यामधून जातो. भारतातील पहिली ट्रेन जेव्हा १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे पर्यंत धावली तेव्हा हे पहिले टर्मिनेशन स्टेशन होते.
दीड दशकांचा प्रवास
1. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनच्या कामास सन २००८ मध्ये रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव असताना २८७ कोटी ला मंजुरी मिळवली होती.
2. सन २०११ मध्ये याचे काम सुरु झाले.
3. सन २०१७ साली या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन झाले.
4. सन २०१९ मध्ये रेतीबंदर या भागात ब्रिज उभारण्यासाठी पर्यावरण खात्याची आवश्यक असलेली मंजुरी मिळाली.
5. या कामाला गती मिळत नसल्याने हे काम अतिशय संत गतीने सुरु होते. अखेरीस या प्रकल्पाची रक्कम ६२० कोटी पर्यंत गेली.
6. ४ वर्षापूर्वी दिवा रेल्वे स्थानकादरम्यान भावेश नकाते या तरुणास गर्दीमुळे जीव आपला गमवावा लागला.
7. त्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक एस के सूद यांच्यासोबत सर्व खासदारांची कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या झालेल्या बैठकीत खासदार राजन विचारे व श्रीकांत शिंदे यांनी या मध्य रेल्वे मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे फेऱ्यात वाढ करण्याचा मुद्दा धरून धरला होता. त्यावेळी पाचव्या व सहाव्या लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. खऱ्या अर्थाने आज या कामाला गती मिळाल्याने हे काम पूर्ण झाले. या नवीन पाचव्या व सहाव्या लाईनमुळे नवीन मार्गिका तयार झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरच्या लोकल व लांब पल्ल्यांच्या गाड्या यांना दोन वेगवेगळे मार्ग तयार झाल्याने सिग्नलसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच होणारे अपघात टळू शकणार आहेत.