ETV Bharat / city

राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार, 'असा'  आहे इतिहास

संध्या महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे. महाराष्ट्रत या आधी दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली होती, या विषयी सविस्तर वृत्त.

राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार
author img

By

Published : Nov 8, 2019, 9:41 AM IST

मुंबई- राज्यावर सध्या राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे. राज्यानं आत्तापर्यंत दोन वेळा राष्ट्रपती राजवट पाहिली आहे. या दोन्ही वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध राहिला आहे. आता तिसऱ्या वेळीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. योगायोगाने पुन्हा पवारच केंद्र स्थानी आहेत.

पहिली राष्ट्रपती राजवट १९८०

वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून राज्यात शरद पवारांनी पुलोदचं प्रयोग केला होता. सर्वात लहान वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सत्ता मिळवली. त्याच काळात केंद्रात जनतादलाचे सरकार होते. मात्र अंतर्गत वादामुळे ते सरकार थोड्याच कालावधीत पडले. त्यानंतर इंदिरा गांधीचे सरकार केंद्रात आले. त्यांनी महाराष्ट्रातले शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त केले. सरकार बरखास्त केल्यानंतर १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० असे ११२ दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. पुढे निवडणुका होऊन काँग्रेसला बहुमत मिळाले आणि बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. तिथेच राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली.

दुसरी राष्ट्रपती राजवट २०१४

राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे सरकार अल्पमतात आले होते. अशा स्थितीत राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यावेळी २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवस राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवटी खालीच राज्याची निवडणूकही पार पडली. पुढे भाजप सरकार राज्यात स्थापन झाले आणि राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली.

Intro:Body:

राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार, "असा"  आहे इतिहास

मुंबई- राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट सध्या आहे. राज्यानं आत्ता पर्यंत दोन वेळा राष्ट्रपती राजवट पाहिली आहे. या दोन्ही वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध राहीला आहे. आता तिसऱ्या वेळीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. योगायोगाने पुन्हा पवारच केंद्र स्थानी आहेत.  

पहिली राष्ट्रपती राजवट १९८०

वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून राज्यात शरद पवारांनी पुलोदचं प्रयोग केला होता. सर्वात लहान वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सत्ता मिळवली. त्याच काळात केंद्रात जनतादलाचे सरकार होते. मात्र अंतर्गत वादामुळे ते सरकार थोड्याच कालावधीत पडले. त्यानंतर इंदिरा गांधीचे सरकार केंद्रात आले. त्यांनी महाराष्ट्रातले शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त केले. सरकार बरखास्त केल्यानंतर १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जुन १९८०  असे  ११२ दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. पुढे निवडणूका होऊन काँग्रेसला बहुमत मिळाली आणि बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले. तिथेच राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली.  

दुसरी राष्ट्रपती राजवट २०१४ 

राज्यात पृथ्विराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार होते. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा पाठींबा काढून टाकला. त्यामुळे सरकार अल्पमतात आले होते. अशा स्थितीत राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारत केली होती. २८ सप्टेंबर २०१४  ते  ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवस राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवटी खालीच राज्याची निवडणूकही पार पडली. पुढे भाजप सरकार राज्यात स्थापन झाले आणि राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली.    

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.