ETV Bharat / city

पाटर्यांची निमंत्रणे आघाडी सरकारच्या मंत्र्यांना कशी येतात?, प्रवीण दरेकरांचा सवाल - विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर

कार्डिलिया क्रूझ पार्टीचे निमंत्रण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही दिलं गेलं होतं. मात्र अशा पार्ट्यांचे निमंत्रण आघाडी सरकारच्या पालकमंत्र्यांना कसं मिळते? असा सवाल राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

Praveen Darekar
Praveen Darekar
author img

By

Published : Nov 8, 2021, 6:47 PM IST

Updated : Nov 8, 2021, 6:56 PM IST

मुंबई - कार्डिलिया क्रूझ पार्टीचे निमंत्रण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही दिलं गेलं होतं. मात्र अशा पार्ट्यांचे निमंत्रण आघाडी सरकारच्या पालकमंत्र्यांना कसं मिळते? असा सवाल राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. आपल्याला पालकमंत्री असल्यामुळे औपचारिकरित्या क्रूझवरील पार्टीचे आमंत्रण आले होते. मात्र पार्टीचा आयोजक काशिफ खान यांना आपण ओळखत नसल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पण अस्लम शेख यांच्यासोबत काशीफ खान यांचे फोटो आहेत. हे फोटो नेमके कसे आले ? याबाबत अस्लम शेख यांची भूमिका तपासली गेली पाहिजे, अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच उपनगर आणि मुंबईच्या पालकमंत्र्यांना अशा पार्ट्यांची निमंत्रणे का येतात? इतर मंत्र्यांना असे निमंत्रण का येत नाही, याचा विचारही केला गेला पाहिजे असंही यावेळी दरेकर म्हणाले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
राऊत आणि मलिक आरोपींचे प्रवक्ते -
भारतीय जनता पक्ष कोणत्याही अधिकारी किंवा राजकीय पक्षांसोबत उभा नाही. मात्र तपास यंत्रणा समाजाचेही काम करते अशा वेळेस कोणी व्यक्ती किंवा राजकीय नेता तपास यंत्रणेच्या बाजूने उभा राहत असेल तर, ती भूमिका राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे असते. आम्ही कोणत्याही तपास यंत्रणेचे प्रवक्ते नाही. मात्र सातत्याने नवाब मलिक आणि संजय राऊत ज्याप्रमाणे आरोपींच्या बाजूने बोलत आहेत. त्यामुळे नवाब मलिक आणि संजय राऊत हे आरोपींचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
सासर आणि माहेरच्या नातेवाईकांची जंत्री मालिकांनी उभी केली -
नवाब मलिक ज्याप्रमाणे राजकारण करत आहेत. त्या प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नाही. रोज नवीन मुद्दा समोर आणून या प्रकरणात आपल्याला काहीतरी माहित आहे, असा आव मलिक आणत आहेत. समीर वानखेडे यांच्या माहेर आणि सासरच्या लोकांची जणू जंत्रीच त्यांनी उभी केली आहे. असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी नवा मालिकांना लगावला आहे. तसेच नोटबंदीमुळे सर्वसामान्य लोकांना फायदा झाला. मात्र पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे नवाब मलिक यांना नक्कीच त्रास झाला. नोट बंदी मुळे दलालांचा फायदा बंद झाला याची पोटदुखी नवाब मलिक यांना असेल. म्हणून, कारण नसतानाही आज नोट बंदी बाबत ते बोलत असल्याचा चिमटा प्रवीण दरेकर यांनी काढला आहे.

Last Updated : Nov 8, 2021, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.