ETV Bharat / city

Pratibha Patil Birthday Special: कॉलेज क्वीन ते महिला राष्ट्रपती; असा राहिला आहे प्रतिभाताईंचा राजकीय प्रवास - प्रतिभा पाटील पुणे

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ( Pratibha Patil 87th Birthday ) यांचा आज 87वा वाढदिवस आहे. 25 जुलै 2007 रोजी त्यांनी देशाच्या १२ व्या राष्ट्रपती (12th President Of India ) म्हणून शपथ घेतली आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा ( Indias First Women President Pratibha Patil ) मान त्यांना मिळाला. कॉलेज क्वीन ते यशस्वी राजकारणी, राजस्थानच्या राज्यपाल आणि पुढे देशाच्या राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतीय राजकारणावर उमटवला.

Pratibha Patil Birthday Special
Pratibha Patil Birthday Special
author img

By

Published : Dec 19, 2021, 12:11 AM IST

मुंबई - भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ( Pratibha Patil 87th Birthday ) यांचा आज 87वा वाढदिवस आहे. 25 जुलै 2007 रोजी त्यांनी देशाच्या १२ व्या राष्ट्रपती (12th President Of India ) म्हणून शपथ घेतली आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा ( Indias First Women President Pratibha Patil ) मान त्यांना मिळाला. कॉलेज क्वीन ते यशस्वी राजकारणी, राजस्थानच्या राज्यपाल आणि पुढे देशाच्या राष्ट्रपती अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतीय राजकारणावर उमटवला. प्रतिभाताई यांचा राजकीय (Pratibha Patil Political Journey ) प्रवास थक्क करणारा राहिला आहे. आज प्रतिभाताईंच्या 87व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय कारकर्दीचा घेतलेला आढावा.

  • जळगावात गेलं प्रतिभाताईंचं बालपण -

प्रतिभाताई पाटील यांचा ( Pratibha Patil Birthday ) जन्म 19 डिसेंबर 1934 रोजी जळगावमध्ये ( Pratibha Patil Birthplace ) झाला. त्यांचं बालपण हे जळगाव आणि जवळच असलेल्या चाळीसगाव येथे गेले. पुढे प्रतिभाताईंनी आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जळगावमधूनच पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनात त्या उत्कृष्ट टेबल टेनिसपटू (Pratibha Patil Table Tanis Player ) होत्या. त्यांनी युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसे जिंकली होती. एम. जे. महाविद्यालयात शिकत असताना त्यांना 'कॉलेज क्वीन'चा खिताबही मिळाला होता. त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे एलएलबी केल्यानंतर प्रतिभाताईंनी वकिलीस प्रारंभ केला. त्याच काळात महिलांच्या सामाजिक प्रश्नांमध्ये त्या लक्ष घालू लागल्या आणि त्यातूनच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. सन 1965 मध्ये प्रतिभाताईंचा अमरावती येथील शिक्षणतज्ज्ञ डॉ. देविसिंग शेखावत (Pratibha patil husband Devisingh Shekhawat ) यांच्याशी विवाह झाला. डॉ. देविसिंग शेखावत हे 1985 ते 1990 दरम्यान, अमरावतीचे आमदार होते. तसेच ते 1992 मध्ये अमरावतीचे पहिले ( Amravati First Mayor ) महापौरही झाले.

  • अशी राहिली प्रतिभाताईंची राजकीय कारकीर्द -

प्रतिभाताईंनी साठच्या दशकात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1962 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी काँग्रेसच्या तिकीटावर जळगावमधून विधानसभेची निवडणूक लढवली आणि यशही मिळवले. त्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्या १९६७ ते १९८५ दरम्यान चारवेळा निवडून आल्या. दरम्यानच्या काळात त्यांनी आरोग्य, समाज कल्याण, पर्यटन, गृहनिर्माण, पुनर्वसन आणि सांस्कृतिक कार्य, शिक्षण, नगरविकास आणि गृहनिर्माण, नागरी पुरवठा आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केले. तर जुलै 1979 ते फेब्रुवारी 1980 या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम केले. पुढे 1985 दरम्यान त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. 1990 पर्यंत त्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्य होत्या. तसेच 2004 मध्ये त्यांची राजस्थानच्या 24व्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांची सर्वात जास्त कारकीर्द गाजली ती राष्ट्रपती म्हणून. 2007 मध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांना मिळाला.

  • राष्ट्रपतीपदाची कारकीर्द गाजली -

प्रतिभाताईंची राष्ट्रपतीपदाची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त राहिली. रेकॉर्डनुसार या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून आधीच्या राष्ट्रपतींपेक्षा सर्वाधिक विदेश दौरे केले. तसेच प्रतिभाताईंकडे आतापर्यंतच्या सर्वात दयावान राष्ट्रपती म्हणून देखील बघितल्या जातं. त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गंभीर आरोपातील आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत केली.

  • विविध क्षेत्रात कार्यकतृत्वाचा ठसा उमटवला -

प्रतिभाताईंनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राजकीय क्षेत्रासोबतच त्यांनी सामाजिक जिवनातही, विशेषत: महिलांसाठी भरीव कार्य केले. त्यांनी श्रमसाधना ( Shram Sadhana Trust ) ट्रस्टच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांसाठी दिल्ली, मुंबई आणि पुण्यात वसतीगृहांची स्थापना केली. तर जळगावमध्ये मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यातून त्यांनी अनेकांच्या रोजगाराची सोय केली. तसेच पती देवीसिंह शेखावत यांच्यासोबत मिळून त्यांनी विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अमरावती, जळगाव आणि मुंबईत शाळा-महाविद्यालये सुरु केली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना 'ईटीव्ही भारत'कडून वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : बहादुरशाह जफर यांचा ब्रिटिशांविरोधातील लढा, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.