ETV Bharat / city

'शरद पवार दोन वेळा पंतप्रधान होताना राहिले, पण तो दिवस पुन्हा येईल' - Sharad Pawar birthday program in Mumbai

शरद पवार यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी राज्यातील सर्व 48 खासदार एकत्र आले तर एक वेगळे चित्र निर्माण होऊ शकेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले. यावेळी पटेल यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीकाही केली.

प्रफुल पटेल
प्रफुल पटेल
author img

By

Published : Dec 12, 2020, 5:29 PM IST

Updated : Dec 12, 2020, 5:56 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान होताना दोन वेळा राहिले. मात्र ते पुन्हा पंतप्रधान होऊ शकतील, असे आम्हाला वाटते, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठामध्ये बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शरद पवारांना दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी आली होती. ते पंतप्रधान होताना थांबले. मात्र, ते पुढे आम्हाला पंतप्रधान होतील असे वाटते. तसेच शरद पवार यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी राज्यातील सर्व 48 खासदार एकत्र आले तर एक वेगळे चित्र निर्माण होऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

'शरद पवार पुन्हा पंतप्रधान होतील'

आलेल्या अनुभवावर पुस्तक लिहिले-

प्रफुल पटेल यांनी काँग्रेसवर टीका करणारा एक लेख लिहिला आहे. त्यावर विचारले असता ते म्हणाले की, आम्ही यूपीएच्या काळात काँग्रेससोबत होतो. मला जे वाटले, जे अनुभव आले त्यावर मी लिहिले आहे. मात्र काँग्रेससोबत आम्ही नव्हतो. त्यानंतर त्यावर मी काही लिहिले नाही, असा खुलासा पटेल यांनी केला.

हेही वाचा- शरद पवारांकडून शिकण्याची प्रेरणा मिळत राहील- उर्मिला मातोंडकर

प्रणव मुखर्जींचे पुस्तक वाचले नाही-
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातील काँग्रेसवरील टिकेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की मी ते पुस्तक वाचले नाही. परंतु त्यांचा काही काँग्रेस संदर्भात वेगळा अनुभव असेल. तो अनुभव त्यांनी मांडला असेल. मात्र, आम्ही यूपीए काळात काँग्रेससोबत होतो. त्यावेळी आलेल्या अनुभवावर मी लिहिले आहे. बाहेर पडल्यानंतर यावर मी काही लिहिले नव्हतो, असा दावाही प्रफुल पटेल यांनी केला.

हेही वाचा-शरद पवारांचा ८० वा वाढदिवस : शरद पवारांच्या आठवणी सांगताना हसन मुश्रीफांना अश्रू अनावर

पटेलांची राहुल गांधींवर खोचक टीका-
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत अथवा त्यासंदर्भात ट्विटही केले नाही. त्यावर विचारले असता प्रफुल पटेल म्हणाले की त्यांना कोण विचारात घेतो? त्यांच्या पक्षात तरी त्यांना विचारतात का, अशी खोचक टीका प्रफुल पटेल यांनी राहुल गांधीवर केली.

शरद पवारांच्या आजोळीही वाढदिवस साजरा-

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. त्यांच्या आजोळच्या मंडळींनीसुद्धा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. प्रत्यक्षात शरद पवार यांना भेटू शकत नसले, तरी त्यांच्याबद्दल असलेले प्रेम गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा करून व्यक्त केले आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे शरद पवार यांचे आजोळ आहे.

Last Updated : Dec 12, 2020, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.