मुंबई - महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदावर विनोद मिश्रा तर विरोधी पक्ष नेतेपदी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मनोज कोटक खासदार झाल्यानंतरही गटनेते या पद सांभाळत होते. यानंतर आज भाजपच्या बैठकीत या दोन नावांची घोषणा करण्यात आली.
राज्यातील भाजप आणि सेना युतीचे समीकरण बदलल्यानंतर पालिकेत देखील त्याचे पडसाद उमटले. भाजपने महानगरपालिकेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक उपस्थित होते.
यावेळी गटनेतेपदी विनोद मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच विरोधी पक्षनेते पदावर प्रभाकर शिंदे यांचे नावाचे शिक्कामोर्तब झाले आहे. तर उपनेते पदी उज्ज्वला मोडक व रिटा मकवाना यांच्या नावाची घोषणा झाली आहे.