ETV Bharat / city

आता 'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' संदेशाचे पोस्टर; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन - vaccination in mumbai

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे लसीकरण वेगाने व्हावे, याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती होण्याकरिता 'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' आणि ''My Society, Responsible Society" असा संदेश असलेली मराठी व इंग्रजी भाषेतील भित्तीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Oct 5, 2021, 4:49 PM IST

मुंबई - मुंबईत १०० टक्के लसीकरण झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये 'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' पोस्टर लावली जाणार आहेत. ही अभिमानास्पद बाब असून आता इतर सहकारी गृहरचना संस्थांनी देखील लवकरात लवकर १०० टक्के लसीकरणाचे ध्येय गाठावे', असे आवाहन महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

गृहनिर्माण सोसायट्यांवर पोस्टर -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणात सर्व नागरिकांचा सहभाग असावा तसेच त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी १०० टक्के लसीकरण झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये 'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' पोस्टर लावण्याचा सल्ला दिला होता. महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील ज्या सहकारी गृहरचना संस्थांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, अशा सोसायट्यांच्या दर्शनी भागी लावण्यात येतील असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पोस्टर'वर 'क्यू आर कोड' -

या पोस्टरवर १०० टक्के लसीकरण झालेल्या सहकारी संस्थेचे नाव, पालिका विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची स्वाक्षरी असणे व महापालिकेचा स्टॅम्प बंधनकारक आहे. या 'पोस्टर'वर एक 'क्यू आर कोड' असून तो आपल्या मोबाईलच्या सहाय्याने स्कॅन केल्यावर https://stopcoronavirus.mcgm.gov.in/vaccination हे संकेतस्थळ उघडले जाणार आहे. या लिंक वर सदर गृहरचना संस्था ज्या परिसरामध्ये आहे, त्या परिसरातील लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध असणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

जनजागृतीकरिता पोस्टर -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.