ETV Bharat / city

Godavari River : गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता; राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या ( Pranhita River ) पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची ( Increased Discharge Of Godavari River ) शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ministry
मंत्रालय
author img

By

Published : Jul 17, 2022, 6:35 PM IST

मुंबई - नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेजचे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले आहेत. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची ( Increased Discharge Of Godavari River ) शक्यता आहे. तसेच नद्याही तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आल्या आहे.

परशुराम घाटात एकेरी वाहतूक - जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथे दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत, सकाळी ६ ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवली असून, सायंकाळी ७. वा. ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात ११ हजार नागरिक सुरक्षित -. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. तर राज्यात आतापर्यंत ११ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०४ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर १८९ प्राणी दगावले आहेत. अशी माहिती राज्य शासनाने दिली.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात - मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर-१, रायगड-महाड-१, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या - मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत. राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ( State Disaster Ministry Control Room ) आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल दिला आहे.

हेही वाचा : Godavari Flood : पाऊस वाढल्याने गोदावरी नदीला पूर, 'या' गावातील नागरिकांचे केले स्थलांतर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.