ETV Bharat / city

कोरोना लढा : पोलीस असलेले वडील कर्तव्यावर; हैदराबादमधून मुलाने लिहिले भावनिक पत्र - महाराष्ट्र पोलीस

कोरोनाचा वेगाने संसर्ग पसरत असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण आहे. सर्व राज्ये व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एकीकडे सगळीकडे पोलीस चोवीस तास कर्तव्यावर कार्यरत आहेत. ईटीव्ही भारतमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या अक्षय पोकळे याने वडिलांबद्दल वाटणारी काळजी आणि पोलिसांच्या कुटुंबियांची होणारी घालमेल  पत्रातून व्यक्त केली आहे.

पोलीस अधिकारी बाळासाहेब पोकळे
पोलीस अधिकारी बाळासाहेब पोकळे
author img

By

Published : Mar 30, 2020, 7:26 PM IST

Updated : Dec 10, 2021, 9:57 PM IST

अक्षय पोकळे (हैदराबाद) - कोरोनामुळे अनेकांना घरातच राहण्याचे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अतिउत्साही व बेशिस्त लोकांना आवर घालण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरून त्यांना घरी पाठवत आहेत. पण पोलिसांच्या कुटुंबियांचा कोण विचार करते का? हैदराबादमध्ये ईटीव्ही भारतमध्ये काम करणाऱ्या मुलाने पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांना काळजीने पत्र लिहिले आहे.

कोरोनाचा वेगाने संसर्ग पसरत असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण आहे. सर्व राज्ये व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एकीकडे सगळीकडे पोलीस चोवीस तास कर्तव्यावर कार्यरत आहेत. ईटीव्ही भारतमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या अक्षय पोकळे (Akshay Pokale) याने वडिलांबद्दल वाटणारी काळजी आणि पोलिसांच्या कुटुंबियांची होणारी घालमेल पत्रातून व्यक्त केली आहे.

सकाळपासून रात्रीपर्यंत ऑन ड्युटी
सकाळपासून रात्रीपर्यंत ऑन ड्युटी

कोरोना असो या डोरोना ..आपले पोलीस कुठे कुणाला घाबरतात...

अक्षय पोकळे याने पत्रात लिहिले की, सध्या जगभरात कोरोनाची दहशत आहे. आपल्या देशासह राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, पप्पा हे तुम्हाला तर माहितीच आहे. देशात लॉकडाऊन सुरू आहे. शहरात राहणारे नागरिक आता आपल्या आपल्या खेडेगावात जात आहेत. पण आपलं तस नाही.. तुम्ही एक जबाबदार पोलीस अधिकारी आहात. तुम्हाला सुट्टी नाही, तुमच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. नागरिकांना घरी बसून राहण्यासाठी सक्ती केली जात आहे, कारण त्यांच्या तब्येतीची काळजी आहे म्हणून....पण या महामारीत पोलीस रस्त्यावर येऊन प्रत्येक नागरिकाला घरात बसायला सांगत आहेत. पण पोलिसांचा विचार कोणी करतंय का? पोलिसांना सर्वच सॅल्युट करतातय पण पडद्यामागचे वास्तव कुठे माहिती आहे कुणाला. तुम्ही रोज सकाळपासून रात्री कधीपर्यंत ऑन ड्युटी असाल हे तुम्हीसुद्धा सांगू शकणार नाहीत. सध्या सर्वजण घरी बसून आहेत. अशावेळी तुम्ही आमच्यासाठी ऑन ड्युटी असता. आपण कोरोनापासून सावध रहावं असे प्रत्येकालाच वाटत असतं. पण तुम्ही कशाचीच तमा न बाळगता आमच्यासाठी कोरोनाशी दोन हात करत आहात. कोरोना असो या डोरोना.

हेही वाचा-डॉक्टरांची चिठ्ठी आणल्यास मद्यपींना मिळणार दारू, राज्य सरकारचा निर्णय..आपले पोलीस कुठे कुणाला घाबरतात...

अगदी माझा जन्म झाल्यापासूनच मी पोलिसांना खूप जवळून बघितलं आहे. कायमच जनतेच्या रक्षणासाठी तुम्ही काही काळ दौंड, गडचिरोली, मुंबई, अहमदनगर तसेच राज्यातल्या इतर भागात ड्युटी केली आहे...अजूनही आठवतंय तुम्ही गडचिरोलीला ड्युटीला होते तर त्या जंगलात मोबाईलला रेंज येत नव्हती. तर तुम्ही झाडावर चढून घरी फोन करायचे...त्यानंतर आतादेखील बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड (बी.डी.डी.एस) च्या माध्यमातून स्वतःचाच जीव धोक्यात घालून आमच्या सर्वांच्या रक्षणासाठी पप्पा तुम्ही तत्पर असतात...राज्यावर कोणतेही संकट आले, तर तुम्ही म्हणजे आपले पोलीस त्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी कायम तयार असतात...पप्पा आता लॉकडाऊनमध्ये काही अतिउत्साही लोक घराबाहेर पडत आहेत तर त्यांना समज देण्यासाठी पोलिसांना कधीकधी लाठी उचलावी लागते...हे करणे खरच गरजेचे आहे यात काहीच चुकीचे नाही...

हेही वाचा-महाराष्ट्र पोलिसांनाही 50 लाखांचे विमा कवच द्या, गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी

मूळ मुद्दा, सर्वजण काळजी घेत असतीलच, पण तुम्हीसुद्धा जनतेची सेवा करता करता. तुमची स्वतःची पण काळजी घ्या. बाहेर ड्युटीला असताना मास्क लावा, हँड वापरा, सॅनिटायझर जवळ ठेवा, हात कायम धुवा. तसेच तुम्हाला जेवढी तुमची काळजी घेणं शक्य होईल तेवढं करा, ही विनंती आहे पप्पा तुम्हाला...

बिग सॅल्युट फॉर महाराष्ट्र पोलीस! त्याबरोबरच पत्रकार, डॉक्टर्स, मेडिकलचा सर्व स्टाफ, कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाला सलाम!

तुमचा चिरंजीव,

अक्षय बाळासाहेब पोकळे

)Akshay Pokale)

पोलिसाच्या मुलाने लिहिलेले भावनिक पत्र वाचून तरी नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावे, अशी समाज माध्यमामधून भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Dec 10, 2021, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.